जसप्रीत बुमराह: अचूक टप्पा, चेंडूवर योग्य नियंत्रण आणि उत्तम वेग यांचा त्रिवेणी संगम असलेला भारतीय खेळाडू म्हणजे जसप्रीत बुमराह होय. गेल्या वर्षभरापासून दुखापतीने ग्रासलेल्या बुमराहने विश्वचषकापूर्वी आशिया चषक स्पर्धेत कमबॅक केले. विश्वचषकातही त्याचा गोलंदाजी मध्ये दबदबा कायम आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन सामन्यात सर्वाधिक आठ गडी बाद केले आहेत.
IND vs BAN सामन्यात जसप्रीत बुमराह मोडू शकतो कपिल देवचा हा मोठा विक्रम..
आपल्या धारदार गोलंदाजीने फलंदाजांमध्ये एक धाक निर्माण केलेल्या बुमराहला विश्वचषकात एक विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेमध्ये 17.84 च्या सरासरीने 26 गडी बाद केले आहेत. तसेच दोन वेळा चार गडी बाद करण्याचा विक्रम ही केला आहे. त्याने पुढील सामन्यात आणखीन तीन गडी बाद केल्यास माजी कर्णधार कपिल देव यांचा विक्रम तो मोडू शकतो.
माजी कर्णधार कपिलदेव यांनी विश्वचषकातील 25 सामन्यात 28 बळी घेतले आहेत. देव यांना मागे टाकण्याची व टॉप फाइव गोलंदाजामध्ये येण्याची संधी त्याला चालून आली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक गडी बाद करण्यामध्ये जहीर खान आणि जवागल श्रीनाथ अनुक्रमे टॉपवर आहेत. या दोघांनी प्रत्येकी 44 गडी बाद केले आहेत.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याच्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये मोहम्मद शमीचा तिसरा क्रमांक येतो. शमीने एकूण 32 गडी बाद केले आहेत. यंदाच्या विश्वचषकात शमीला एकही सामना खेळता आला नाही. अन्यथा तो देखील या दोघांचा विक्रम मोडू शकला असता. शमीला जाहीर आणि जवागलचा विक्रम ओढून काढण्यासाठी 12 विकेट ची गरज आहे.
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या टॉप फाईव्हमध्ये अनिल कुंबळे हा एकमेव फिरकीपटू आहे. त्याने 31 गडी बाद केले आहेत. मोहम्मद शमी वगळता इतर चारही गोलंदाज क्रिकेटमधून आता निवृत्त झाले आहेत. जसप्रीत बुमराह हा भारताचा गोलंदाजी मधील हुकमी एकका आहे. त्याचा परफॉर्मन्स जर यंदाच्या विश्व चषकात कायम राहिला तर भारताला विश्वचषक जिंकण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.
भारताचा विश्वचषकातील पुढचा चौथा सामना पुणे येथे बांगलादेशच्या संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड असले तरी रोहित शर्मा बांगलादेशला कमी लेखण्याची चूक कदापि करणार नाही. कारण यापूर्वी बांगलादेशने वेस्टइंडीजमध्ये 2007 विश्वचषक स्पर्धेत भारताला अपसेट केले होते. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेत देखील भारताचा पराभव त्यांनी केला आहे. यंदाच्या विश्वचषकात अफगाणिस्ताने इंग्लंडला तर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला अपसेट केले आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी