Ind vs Ban Live: आज कसोटी जिंकताच भारतीय संघ रचणार इतिहास, कोणताही संघ आसपास देखील नसणार..!

Ind vs Ban Live: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी कानपूरमध्ये खेळली जात आहे. चौथ्या दिवशी भारताच्या दमदार फलंदाजीमुळे हा सामना रोमांचक झाला आहे. पाचव्या दिवशी भारत बांगलादेशला लवकर ऑलआउट करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.

जर टीम इंडिया कानपूर कसोटी जिंकण्यात यशस्वी ठरली तर,एक मोठा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होणार आहे.ज्याच्या जवळ इतर कोणताही संघ आसपास देखील नाहीये. नक्की कोणता आहे हा विक्रम? जाणून घेऊया अगदी सविस्तर..

IND vs BAN: भारतीय संघाने रचला इतिहास, तिसऱ्या दिवशी नावावर केले तब्बल एवढे विक्रम..

Ind vs Ban Live:घरच्या भूमीवर सलग 18 कसोटी मालिका जिंकणारा भारत ठरेल पहिला संघ.

भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम आहे. संघाने फेब्रुवारी 2013 पासून घरच्या मैदानावर सलग 17 कसोटी मालिका जिंकल्या आहेत. संघाने शेवटची 2012-13 मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला 1-2 अशा फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

ऑक्टोबर 2016 ते मे 2020 पर्यंत भारत हा जगातील नंबर वन संघ होता. या काळात संघ सलग ४२ महिने अव्वल स्थानावर राहिला. 2018 मध्ये संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला, हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय आहे. घरच्या मैदानावर सलग कसोटी मालिका जिंकणाऱ्या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे संघ नोव्हेंबर 1994 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान सलग दहा कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला होता.

संघाने एकदा नव्हे तर दोनदा ही कामगिरी केली आहे. याशिवाय संघाने जुलै 2004 ते नोव्हेंबर 2008 दरम्यान घरच्या मैदानावर दहा कसोटी मालिकाही जिंकण्यात यश मिळवले आहे. सलग 16 कसोटी जिंकण्याचा विक्रमही कांगारू संघाच्या नावावर आहे. 1999 ते 2001 आणि पुन्हा 2005 ते 2008 या काळात त्याने ही कामगिरी केली.

Ind vs Ban Live: आज कसोटी जिंकताच भारतीय संघ रचणार इतिहास, कोणताही संघ आसपास देखील नसणार..!

वेस्ट इंडिजच्या नावावर एक खास विक्रम!

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs BAN) व्यतिरिक्त, वेस्ट इंडिजने मार्च 1976 ते फेब्रुवारी 1986 दरम्यान सलग आठ मायदेशात कसोटी मालिका जिंकण्यात यश मिळवले. क्लाइव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली, वेस्ट इंडिजने 1982 ते 1984 दरम्यान सलग 27 कसोटी सामने जिंकले, जे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाने सर्वाधिक काळ जिंकण्याचा विक्रम आहे.


हे पण वाचा:

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..