IND vs BAN: दुसऱ्या कसोटीमध्ये फक्त 23 धावा करून रोहित शर्माने नावावर केला अनोखा विक्रम, अशी कामगारी करणारा ठरला क्रिकेटच्या इतिहासातील चौथा खेळाडू..

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना ग्रीन पार्क, कानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर एक मोठा विक्रम जमा झाला आहे.

IND vs BAN: खालिद अहमदच्या चेंडूवर रोहित शर्माने ठोकले लगातार षटकार.

रोहित शर्माने पहिल्या डावात 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 23 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. यासह तो कसोटीत आपल्या डावातील पहिल्या दोन चेंडूंवर षटकार मारणारा चौथा खेळाडू ठरला आहे.

IND vs BAN: भारतीय संघाने रचला इतिहास, तिसऱ्या दिवशी नावावर केले तब्बल एवढे विक्रम..

टीम इंडियाच्या पहिल्या डावातील दुसऱ्याच षटकात रोहित शर्मा स्ट्राइकवर आला. यावेळी खालिद अहमद ओव्हरवर आला होता. रोहितने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकत ही खास कामगिरी केली. रोहितआधी  उमेश यादव (वि. दक्षिण आफ्रिका, 2019), माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर (वि. ऑस्ट्रेलिया, 2013) आणि वेस्ट इंडिजचा फलंदाज फॉफी विल्यम्स (वि. इंग्लंड, 1948) यांनी ही कामगिरी केली होती.

IND vs BAN: दुसऱ्या कसोटी सामन्याची स्थिती.

तिसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा संघ पहिल्या डावात 233 धावांत सर्वबाद झाला होता. बांगलादेशकडून मोमिनुल हकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 194 चेंडूत 107 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 17 चौकार आणि 1 षटकार मारला.

 

त्याचवेळी टीम इंडियाने आपला डाव 285 धावांवर घोषित केला. भारताकडून यशस्वी जैस्वालने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 51 चेंडूत 72 धावा केल्या. त्याच्याशिवाय राहुलने 43 चेंडूत 68 धावा केल्या. त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले. बांगलादेशकडून मेहदी हसन आणि शाकिबने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने 4-4 विकेट घेतल्या.


हेही वाचा:

Team india victory on Bangladesh: भारताने बांगलादेशवर मिळवला मोठा विजय, तब्बल 92 वर्षानंतर केली अशी कामगिरी.

 

बांगलादेश संघ अडचणीत
बांगलादेशच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही विशेष झाली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. भारताकडून आर अश्विनने दोन्ही विकेट घेतल्या.