IND vs BAN: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये (WTC 2025) आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.
याशिवाय टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 वी मालिका जिंकली आहे. कानपूर कसोटी सामन्यात पावसामुळे दोन दिवस खेळ होऊ शकला नाही. यानंतर टीम इंडियाने पाचव्या दिवशी सामना जिंकला.
IND vs BAN: रोहित शर्मा केला शेवटच्या दिवसाच्या रणनीतीबद्दल खुलासा.
हा सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाच्या रणनीतीबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला,
“आम्ही या सामन्यात अडीच दिवस गमावले. याच कारणामुळे आम्ही चौथ्या दिवशी गोलंदाजी करण्यासाठी आलो तेव्हा आमचे लक्ष लवकरात लवकर विकेट घेण्यावर होते. आम्ही बॅटने काय करू शकतो हे पाहायचे होते. आम्ही किती षटकांत धावा करू शकतो हे पाहायचे होते.
ही रिस्क असली तरी आम्ही ती घ्यायला तयार होतो. आणि याचेच फळ म्हणून आम्ही बांगलादेशच्या सर्व फलंदाजांना बाद करून त्यांनी दिलेले लक्ष पार करण्यात यशस्वी ठरलो, अस रोहित म्हणाला..
हेही वाचा: