IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माला खुणावतोय ब्रायन लाराचा विश्वविक्रम.

आयसीसी विश्वचषक 2023 च्या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपत आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याला छाप सोडता आली नाही, मात्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तान विरुद्ध खेळत असताना त्याने धावांचा रतीब घातला. त्याच्या या खेळीमुळे दोन्ही सामने भारताने एकतर्फी जिंकले. त्याच्या या बहारदार खेळीमुळे रोहित विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टॉप टेन मध्ये आला आहे.

विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. भारताचा पुढचा सामना 19 ऑक्टोंबर रोजी बांगलादेश विरुद्ध पुणे येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी रोहित शर्माला वेस्टइंडीज चा महान फलंदाज ब्रायन लारा याचा विश्वविक्रम खुणावतोय. रोहित शर्माने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात सात धावा केल्या तर तो शाकीब उल हसन याला पाठीमागे टाकू शकतो. तसेच तो 13 धावा काढल्यानंतर एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडू शकतो. लाराला पाठीमागे टाकण्यासाठी रोहितला अजून 31 धावांची गरज आहे.

IND vs BAN : Rohit Sharma's Diet Plan: वडापाव-बिर्याणी नव्हे तर ब्राऊन राईस खाऊन गोलंदाजांची धुलाई करतोय भारतीय कर्णधार.

Rohit Sharma’s Diet Plan: वडापाव-बिर्याणी नव्हे तर ब्राऊन राईस खाऊन गोलंदाजांची धुलाई करतोय भारतीय कर्णधार.

IND vs BAN: या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेमध्ये काढल्यात सर्वाधिक धावा.

रोहितने विश्वचषकाच्या 66.38 च्या सरासरीने 20 सामन्यात 1195 धावा कुटल्या आहेत. 2019च्या विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना 140 धावांची सर्वोत्तम खेळी त्याने केली होती.

सचिन तेंडुलकरने विश्वचषक स्पर्धेच्या 45 सामन्यात 56.95 च्या सरासरीने 2278 सर्वाधिक धावा केल्या आहेत. 152 धावांची सर्वोत्तम खेळी त्याने विश्वचषकात केली होती.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने 45.86 च्या सरासरीने 46 सामन्यात 1643 धावा केल्या आहेत. नाबाद 140 ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

श्रीलंकेचा डावखुरा फलंदाज कुमार संघकारा याने 37 सामन्यात 1532 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 56.74 इतका होता. तसेच त्याने 124 धावांची ऐतिहासिक खेळी देखील केली होती.

IND vs BAN: बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माला खुणावतोय ब्रायन लाराचा विश्वविक्रम.

IND vs PAK: पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूंना बसलाय मानसिक धक्का: खेळाडूच्या अंगात भरला ताप, व्हिडीओ व्हायरल.

ब्रायन लाराने विश्वकप स्पर्धेतील 34 सामन्यात 42.24 च्या सरासरीने 1225 धावा केल्या आहेत. 116 धावांची सर्वोत्तम शतकी खेळी देखील त्याने विश्वचषकात केली होती. दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने विश्वचषकातल्या 23 सामन्यात 1207 धावा केल्या आहेत. नाबाद 162 धावा हा त्याचा विश्वचषकातला बेस्ट स्कोर आहे.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर आतापर्यंत सर्वाधिक धावा, सर्वाधिक षटकार, सर्वाधिक चौकार, पहिल्या चेंडूवर चौकार मारण्याचा, सर्वाधिक विजय यासारख्या अनेक  विक्रमाची नोंद आहे.  रोहित शर्मा यंदाचा विश्वचषक जिंकून नवा विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. असे झाल्यात भारताला विश्वचषक जिंकून देणारा तो तिसरा कर्णधार ठरेल यापूर्वी भारताला कपिल देव (1983)आणि महेंद्रसिंग धोनी (2011) यांनी विश्वचषक जिंकून दिले होते. 2023 मध्ये भारत विश्वचषक जिंकेल का? हे पाहण्यासाठी काही सामन्यांची वाट पहावी लागेल.