IND vs BAN Test Series: भारतीय क्रिकेट संघाला पुढील महिन्यात बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाने दोन टी-20 मालिका जिंकल्या आहेत . टीम इंडियाने झिम्बाब्वे आणि श्रीलंकेचा पराभव केला आहे. त्याचबरोबर लंका संघाविरुद्धच्या वनडे मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. राहुल द्रविडच्या जागी टीम इंडियाचा प्रशिक्षक बनलेल्या गौतम गंभीरसाठी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमधील हे पहिलेच आव्हान आहे. आत्तापर्यंत त्याने टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षण दिले आहे. कसोटीत संघाचा प्रशिक्षक होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
IND vs BAN Test Series: भारतीय संघाच्या प्लेइंग-11 बाबत चर्चा सुरू
मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी चेन्नईत खेळवला जाईल. हा सामना सुरू होण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. असे असतानाही संघाबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाल्या आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात संघाची निवड होण्याची शक्यता आहे. त्याआधी कोणाला संधी मिळणार आणि कोणाला नाही याची चर्चा सुरू आहे. दिग्गज खेळाडूंच्या पुनरागमनामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि गौतम गंभीरचे टेन्शन वाढले आहे.
IND vs BAN Test Series: दिग्गज खेळाडूचे होऊ शकते पुनरागमन..
याआधी झालेल्या शेवटच्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली होती. देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांना खेळण्याची संधी मिळाली. आता यातील अनेक खेळाडूंची संघातून हकालपट्टी होऊ शकते असे दिसते. श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत यांच्या फिटनेसमुळे रोहित शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. आता तो प्लेइंग-11 मधून कोणाला बाहेर ठेवतो हे पाहायचे आहे.
केएल राहुलची थेट स्पर्धा सरफराज खानशी आहे. ऋषभ पंत तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे कसोटीतील स्थान निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत तो यष्टिरक्षक म्हणून खेळू शकणार नाही. सर्फराज हा अनुभवाच्या बाबतीत राहुलशी बरोबरी नाही, पण त्याच्या अलीकडच्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. राहुलबद्दल बोलायचे तर ,त्याने 2023 पासून कसोटी क्रिकेटमध्ये 32.38 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 8 डावात 259 धावा आहेत. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे.
सरफराज खानला यंदा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी मिळाली. त्याने 3 कसोटीच्या 5 डावात 50.00 च्या सरासरीने 200 धावा केल्या आहेत. सर्फराजने 3 अर्धशतके झळकावली आहेत. अलीकडच्या काळात त्याचा विक्रम राहुलपेक्षा सरस असला तरी अनुभवाला प्रथम प्राधान्य दिले जात असल्याचे भारतीय क्रिकेटमध्ये दिसून आले आहे. करुण नायर आणि कुलदीप यादव या खेळाडूंनी याचा सामना केला आहे. अशा स्थितीत सरफराजलाही बाहेर बसावे लागू शकते. त्यांना पुन्हा त्यांच्या वळणाची वाट पाहावी लागणार आहे. राहुल पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यास त्याला प्लेइंग-11 मध्ये ठेवले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?