IND vs BAN test Series: भारतीय क्रिकेट संघ 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मार्च २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर भारताची ही पहिली लाल चेंडूची मालिका असेल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होऊ शकते.
IND vs BAN test Series: टीम इंडियात परतणार धडेकाबाज खेळाडू, निवड समितीने दिला संकेत .
या मलिकेसाठी काही महिन्यांनंतर सामना जिंकणारा खेळाडू संघात परतणार हे निश्चित. हा खेळाडू धोकादायक फलंदाजीत तरबेज आहे. याशिवाय इतरही अनेक खेळाडू आहेत ज्यांना निवडकर्ते परत आणू शकतात. गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच कसोटी मालिका असेल. गेल्या महिन्यात झालेल्या भारत-श्रीलंका दौऱ्यापूर्वी गंभीरला टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले होते.
IND vs BAN test Series साठी भारतीय संघ कधी जाहीर होणार?
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होणार असून, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा करेल.
विराट कोहलीसाठीही ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे, जो जानेवारी महिन्यानंतर या फॉर्मेटमध्ये परतणार आहे. विराटने वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिकाही खेळली नव्हती. वैयक्तिक कारणांमुळे त्याने मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र तो बांग्लादेशविरुद्धच्या या मालिकेसाठी पूर्णपणे उपलब्ध असणार आहे.
ऋषभ पंतचे काही महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन निश्चित आहे. ऋषभ पंत शेवटचा डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामना खेळताना दिसला होता. तथापि, यानंतर तो एका भीषण कार अपघाताचा बळी ठरला, त्यानंतर त्याने 2024 च्या आयपीएलमधून पुनरागमन केले आणि त्यानंतर भारताला टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत आता त्याचे टीम इंडियात पुनरागमन जवळपास निश्चित झाले आहे. पंतने आतापर्यंत 33 कसोटी सामन्यांमध्ये 2271 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. ऋषभ पंत 2021 मध्ये गाबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संस्मरणीय विजयाचा नायक होता.
IND vs BAN test Series साठी सरफराजला संधी मिळेल का?
सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना संघात स्थान मिळणार का, हे पाहणे बाकी आहे. या दोन्ही खेळाडूंनी वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या त्रिकुटाचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे.
पंतशिवाय ध्रुव जुरेल हा दुसरा यष्टिरक्षक म्हणून संघाचा भाग असू शकतो. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज संघात राहणार हे निश्चित मानले जात आहे. जसप्रीत बुमराह खेळला नाही तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आकाश दीप, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार हे पर्याय आहेत.
हे ही वाचा:
PAK vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास. पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला लोळवले, जिंकली संपूर्ण सिरीज..!