IND vs BAN Test Series: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN ) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फिरकी गोलंदाजीचे वर्चस्व अपेक्षित आहे. चेन्नईच्या खेळपट्ट्या नेहमीच फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरल्या आहेत आणि यावेळीही तेच होण्याची शक्यता आहे. या मैदानावर फिरकीला अनुकूल खेळपट्टी तयार करून भारतीय संघ बांगलादेशी फलंदाजांना आव्हान देऊ शकतो. फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या उपस्थितीमुळे भारत आरामात आहे. टीम इंडियाच्या चिंतेचा विषय वेगवान गोलंदाजी आहे. चला एक नजर टाकूया भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजावर..
IND vs BAN Test Series: शमी-बुमराह बाहेर राहतील?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही. बुमराहला विश्रांती देण्यात येईल. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे त्याची टीममध्ये निवड होणार नाही. दुसरीकडे, एकदिवसीय विश्वचषकापासून मैदानाबाहेर असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पुनरागमनासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. शमी अजूनही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. बीसीसीआय त्याच्याबाबतीत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमी थेट मैदानात उतरू शकतो. त्याआधी तो बंगालच्या देशांतर्गत सामन्यांमध्ये हजेरी लावू शकतो. शमी-बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी कोणावर असेल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आम्ही तुम्हाला येथे 5 नावे सांगत आहोत…
मोहम्मद सिराज : शमी-बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद सिराजवर असेल. 2022 मध्ये पदार्पण करणाऱ्या या वेगवान गोलंदाजाने भारतासाठी आतापर्यंत 27 सामने खेळले आहेत. फार कमी वेळात त्याने स्वतःला संघाचा प्रमुख सदस्य बनवले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 74 विकेट आहेत.
मुकेश कुमार: टीम इंडियासाठी 3 कसोटी सामने खेळलेला मुकेश कुमार इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेचा भाग होता. शमी-बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला कायम ठेवता येईल. भारतीय खेळपट्ट्यांवर मुकेश खूप मारक ठरू शकतो. त्याने 3 कसोटीत 7 विकेट्स घेतल्या आहेत.
आकाश दीप : इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या आकाश दीपवर सर्वांच्या नजरा असतील. रांची कसोटीत त्याला संधी मिळाली आणि त्याने आपल्या घातक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आकाशने कारकिर्दीतील पहिल्याच डावात ३ बळी घेतले होते. आता निवडकर्ते त्याला संघात कायम ठेवतात की नाही हे पाहायचे आहे.
आवेश खान : मध्य प्रदेशचा हा वेगवान गोलंदाज कसोटीत पदार्पणाची वाट पाहत आहे. आवेशची इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड झाली होती. मात्र, त्याला संधी मिळाली नाही आणि शेवटच्या 3 कसोटींसाठी त्याची निवड झाली नाही. आवेशने 43 प्रथम श्रेणी सामन्यात 165 विकेट घेतल्या आहेत.
अर्शदीप सिंग: अलीकडच्या काळात, ज्या खेळाडूला कसोटीत आणण्यासाठी सर्वात जास्त विचार केला जातो तो म्हणजे अर्शदीप सिंग. टीम इंडियाला डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाची गरज आहे. सध्याच्या संघात डावखुरा वेगवान गोलंदाज नाही. अर्शदीपने 8 एकदिवसीय सामन्यात 12 आणि 54 टी-20 सामन्यात 83 बळी घेतले आहेत. पंजाबसाठी त्याने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामन्यात 49 बळी घेतले आहेत.
हे ही वाचा:
- IND vs IRE Live Streaming: विश्वचषकातील टीम इंडियाचा पहिला सामना आज, पहा कधी? कुठे किती वाजता सुरु होणार पहिला सामना…!
- BIG UPSET: विश्वचषकात अमेरिकेने पाकिस्तान संघाचा केला पराभव, लज्जास्पद कामगिरीमुळे भडकला बाबर आझम, केले मोठे वक्तवय..