IND vs BAN: केवळ 29 धावा काढूनही दुसऱ्या कसोटीत हिरो ठरला किंग कोहली, भारतीय संघासाठी केला हा भीमपराक्रम..

IND vs BAN: कानपूर कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला आहे. हा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने 2 सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. यासह भारताने घरच्या मैदानावर सलग 18 व्यांदा विजय मिळवण्याचा पराक्रमही केला आहे.

 

IND vs BAN: भारताने जिंकला दुसरा कसोटी सामना..

या सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाने वेगाने धावा केल्या आणि 35 षटकांत 289/9 धावांवर डाव घोषित केला. यानंतर टीम इंडियाने बांगलादेशला दुसऱ्या डावात 146 धावांवर रोखले होते.

यानंतर टीम इंडियासमोर विजयासाठी 95 धावांचे लक्ष्य होते. टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. विराट कोहली 29 आणि पंत 4 धावा करून परतला. या खेळीत त्याने 4 चौकार मारले. या काळात त्याने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे.

IND vs BAN: विराट कोहलीने ही मोठी कामगिरी आपल्या नावावर केली.

या खेळीदरम्यान विराट कोहलीने तिसरा चौकार मारला तेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमधील 1000 चौकार पूर्ण केले. कसोटी क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय ठरला आहे. याआधी हा पराक्रम सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी केला आहे.

 

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणारे  भारतीय क्रिकेटपटू

  1. सचिन तेंडुलकर 2058
  2. राहुल द्रविड 1654
  3. वीरेंद्र सेहवाग 1233
  4. व्हीव्हीएस लक्ष्मण 1135
  5. विराट कोहली 1001*

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहलीपूर्वी केवळ 25 फलंदाजांनी 1000 चौकार मारले आहेत. आता या यादीत विराट कोहलीच्या नावाचाही समावेश झाला आहे. विराट कोहलीने 115 कसोटी सामन्यांच्या 195व्या डावात ही कामगिरी केली आहे.

विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी केली आहे. याशिवाय तो एकमेव सक्रिय क्रिकेटपटू आहे ज्याच्या नावावर एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये 1000 हून अधिक चौकार आहेत.


हेही वाचा:

IND vs BAN: दुसऱ्या कसोटीमध्ये फक्त 23 धावा करून रोहित शर्माने नावावर केला अनोखा विक्रम, अशी कामगारी करणारा ठरला क्रिकेटच्या इतिहासातील चौथा खेळाडू

Team india victory on Bangladesh: भारताने बांगलादेशवर मिळवला मोठा विजय, तब्बल 92 वर्षानंतर केली अशी कामगिरी.