IND vs BAN: भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पराभव करून मालिका 2-0 ने जिंकली. ही मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही केले ज्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.
हा सामना जिंकल्यानंतर जेव्हा पुरस्कार दिले जात होते, तेव्हा रोहित शर्माने ट्रॉफी घेतली आणि स्पेशलिस्ट राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघु भैय्याच्या हातामध्ये ट्रॉफी देऊन त्याला संघाच्या मध्यभागी ट्रॉफीसोबत पोज देण्याची संधी दिली. नक्की कोण आहे हा रघु भैय्या ? जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून..
IND vs BAN: धोनी आणि विराटची परंपरा पुढे नेली
महेंद्रसिंग धोनीही आपल्या कर्णधारपदाखाली जिंकल्यानंतर संघातील सर्वात तरुण खेळाडूला ट्रॉफी देत असे. त्याचवेळी विराटने त्याच्या कर्णधारपदाच्या काळातही असेच केले होते. यानंतर आता रोहित शर्माही तीच परंपरा पुढे नेत आहे.
रोहित शर्माने बांगलादेशविरुद्धची सिरीज जिंकून ट्रॉफी ज्याच्या हातात दिली तो थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघूचे विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी यांनीही कौतुक केले आहे. रघूबद्दल विराट म्हणाला होता की, जर तुम्ही त्याला नेटमध्ये चांगले खेळले तर कोणताही गोलंदाज तुम्हाला त्याच्या वेगाने घाबरवू शकणार नाही.
कानपूर कसोटी सामन्यानंतर रवी शास्त्री यांनी रघूसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने रघूचे कौतुक केले होते आणि म्हटले होते, “तुला भेटून नेहमीच छान वाटते. रघू, तू भारतीय क्रिकेट संघाचा हृदयाचा ठोका आहेस.
कोण आहे राघवेंद्र द्विवेदी उर्फ रघु भैय्या?
राघवेंद्र द्विवेदी हे कर्नाटकातील कुमटा येथील रहिवासी आहेत. त्याला क्रिकेटर व्हायचे होते, पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला. यानंतर तो घरातून निघून गेला. संघर्षाच्या दिवसांत त्यांना हुबळीतील बसस्थानक, मंदिर आणि अगदी स्मशानातही झोपावे लागले. मात्र, त्याची मेहनत फळाला आली.
त्याला कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) कडून राहण्याची जागा मिळाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याची कारकीर्द लवकर संपुष्टात आली. यानंतर तो कोचिंगमध्ये आला आहे. आणि तेव्हापासून भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफचा एक हिस्सा देखील बनला आहे. रोहितने त्याला ट्रॉफी देऊन संघातील खेळाडूंसह संपूर्ण भारतीयांचे मन जिंकले आहे.
हेही वाचा: