भारत बांग्लादेश सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे बदलले सामन्याचे गणित, जर शेवटपर्यंत सामना झालाच नाही तर हा संघ होईल विजयी..!
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील विश्वचषक २०२२ मधील आजचा सामना हा आता पावसामुळे थांबवण्यात आला आहे. बांग्लादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला फलंदाजिचे आमंत्रण दिले होते. ज्यात प्रथमं फलंदाजी करतांना टीम इंडियाने लोकेश राहुल आणि विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात 184 धावा केल्या.
भारतीय संघाचे पहिल्या डावात १४८ धावा करून बांग्लादेश समोर जिंकण्यासाठी 185 धावांचे लक्ष ठेवले होते. प्रत्युतरात बांग्लादेशच्या सलामी जोडीने जबरदस्त फटकेबाजी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. जेव्हा पासून सुरु झाल तेव्हा बांग्लादेशने एकही विकेट न गमावता ७ षटकात ६६ धावा काढल्या होत्या.

नंतर मात्र मैदानावर मुसळधार पावसास सुरवात झाली. ज्यामुळे खेळ थांबवावा लागला.
त्याआधी बांग्लादेशचा सलामीवर दासने भारतीय गोलंदाजाना अक्षरशा धुवून काढले. आपल्या ताबडतोब खेळीत त्याने फक्त २६ चेंडूमध्ये तबल ५९ धावा काढल्या.आणि अजुनही तो मैदानावर तळ ठोकून उभा आहे. पाउस उघडल्यानंतर सुद्धा तो अशीच फलंदाजी करत राहिला तर भारतीय संघाच्या हातून हा सामना निसटेल यात काहीच शंका नाही. त्यामुळे सर्वांत आधी खेळ सुरु झाल्यास त्याला बाद करण्याचे मोठे आव्हान भारतीय संघाच्या गोलंदाजासमोर असणार आहे. फक्त वडापाव खायच्या लायकीचा कर्णधार…. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात सुद्धा फेल झाल्याने ‘रोहित शर्मा’ नेटकर्यांच्या निशाण्यावर, होतोय सोशल मिडीयावर ट्रोल..
जर पासून थांबलाच नाही तर काय असतील सामन्याचे निकाल ?
पावसाने दमदार सुरवात केल्यानंतर आता चाहत्यांच्या मनात अने प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातील सर्वात मोठ प्रश्न म्हणजे जर पासून आज सायंकाळपर्यंत थांबलाच नाही तर काय असणार सामन्याचे निकाल? याच प्रश्नाच्या उत्तरासाठी आम्ही क्रिकेट तज्ञांशी बाब्त्चीत केली. त्यांच्याद्वारे आम्हाला असे कळले की, पासून आता १०/१५ मिनिटाने जरी थांबला तरीही सामन्यात डकवर्थ लुईस नियम लागू होणार ,हे नक्की.
जर डकवर्थ लुईस नियमानुसार बांग्लादेशच्या सध्याच्या धावफलकाची तुलना भारतीय संघाच्या धावफलकशी केली तर बांग्लादेश जवळपास १७ धावांनी समोर आहे. ज्यावरून स्पष्ट होतंय की जर, आज सायंकाळपर्यंत म्हणजे ७ पर्यंत हा समाना पुन्हा सुरु झाला नाही तर बांग्लादेशला या सामन्यात विजयी घोषित करण्यात येईल.
या निर्णयामुळे मात्र भारतीय संघाचा पुढचा प्रवास खूपच अवघड होणार आहे. म्हणूनच भारतीय संघाचे चाहते सामना सुरु होण्याची प्रार्थना करताहेत. मात्र आता सामना कधी सुरु होणार? किंवा होणार कि नाही? या प्रश्नांची उत्तरे कोणाकडेच नाहीयेत.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..