IND vs ENG 2nd Test: विशाखापट्टणमध्ये दुसरा कसोटी सामना उद्यापासून.. 4 फिरकीपटूसह मैदानात उतरू शकते टीम इंडिया, असी असू शकते भारताची प्लेईंग 11

IND vs ENG 2nd Test: विशाखापट्टणमध्ये दुसरा कसोटी सामना उद्यापासून.. 4 फिरकीपटूसह मैदानात उतरू शकते टीम इंडिया, असी असू शकते भारताची प्लेईंग 11

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना उद्या म्हणजेच 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथील ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा संघ १-० ने पुढे आहे. विराट कोहली, केएल राहुल आणि रवींद्र जडेजासारखे स्टार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहेत.

विशाखापट्टणममध्ये विजयाची नोंद केल्यानंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. विशाखापट्टणममध्ये इंग्लंडवर दडपण आणण्यासाठी भारत 4 फिरकीपटूंसह जाऊ शकतो. विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचे कोणते प्लेइंग इलेव्हन मैदानात उतरू शकते यावर एक नजर टाकूया.

IND vs ENG: हैद्राबाद कसोटी जिंकायची असेल तर, चौथ्या दिवशी टीम इंडियाला करावे लागणार हे 3 काम; अन्यथा पोप सामना घेऊन जाणार.

IND vs ENG 2nd Test: भारतीय संघाचे सलामीवीर

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करू शकतो. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल आपल्या स्फोटक फलंदाजीने टीम इंडियाला आक्रमक सुरुवात देऊ शकतात.

IND vs ENG 2nd Test: मध्य क्रम फलंदाज.

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर मैदानातउतरवले जाऊ शकते. खराब फॉर्म असूनही शुभमन गिलला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. जर सरफराजला प्लेईंग 11 मध्ये संधी दिली तर तो  चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरू शकतो. सरफराज खान स्वीप आणि रिव्हर्स स्वीप करण्यात माहिर आहे, त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्यावर विश्वास दाखवू शकते. श्रेयस अय्यरकडे पाचव्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी देण्यात आली आहे.

IND vs ENG 2nd Test:   अष्टपैलू खेळाडू

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, जो बॉलसोबतच बॅटने टीम इंडियाला मजबूत करेल.

IND vs ENG 2nd Test:  यष्टिरक्षक

विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतला ७ व्या क्रमांकावर संधी मिळू शकते.

IND vs ENG 2nd Test:  फिरकीपटू

IND vs ENG 2nd Test: विशाखापट्टणमध्ये दुसरा कसोटी सामना उद्यापासून.. 4 फिरकीपटूसह मैदानात उतरू शकते टीम इंडिया, असी असू शकते भारताची प्लेईंग 11

रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र संधी दिली जाऊ शकते. रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव घातक फिरकी गोलंदाजीमध्ये माहीर आहेत.

IND vs ENG 2nd Test: वेगवान गोलंदाज

जसप्रीत बुमराहला विशाखापट्टणम येथे होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात एकमेव वेगवान गोलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते. अशा स्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडावे लागू शकते.

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *