IND vs ENG 2nd Test: सरफराज खानला संधी मिळेल? दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..

IND vs ENG 2nd Test: सरफराज खानला संधी मिळेल? दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारी रोजी राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंड संघ सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. आता भारतीय संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधायची आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो. कारण दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल बाहेर झाले आहेत. त्यानंतर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG 2nd Test: सरफराज खानला संधी मिळेल? दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..

IND vs ENG 2nd Test: सरफराज खान पदार्पण करू शकतो.

सरफराज खानचा भारतीय  कसोटी संघात प्रवेश झाल्यानंतर त्याचे कुटुंब आणि चाहते खूप आनंदी दिसत आहेत. आता चाहत्यांना आशा आहे की, सरफराज खान दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करू शकेल. दुसरीकडे, आणखी एक खेळाडू आहे जो कसोटीत पदार्पण करू शकतो. होय, आम्ही बोलत आहोत विकेटकीपर फलंदाज रजत पाटीदारबद्दल. दुसऱ्या कसोटीमध्ये वरील दोन्ही पैकी एक खेळाडू तर भारताकडून कसोटी पदार्पण करणार हे मात्र नक्की..

रजत पाटीदारने यापूर्वीच टीम इंडियासाठी वनडे पदार्पण केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर रजतचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला. मात्र, पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले नाही. आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रजतचा संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

IND vs ENG 2nd Test: सरफराज खानला संधी मिळेल? दुसऱ्या कसोटीमध्ये रोहित शर्मा संघात करणार मोठा बदल, या 11 खेळाडूंना मिळू शकते संधी..

IND vs ENG 2nd Test: टीम इंडियाने पहिला सामना गमावला.

पहिला सामना गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर दुसरा सामना जिंकण्याचे आव्हान आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. मात्र, रोहित शर्माचा सध्याचा फॉर्मही काही खास नाही. अशा स्थितीत रोहितला दुसऱ्या सामन्यात मोठी खेळी खेळावी लागणार आहे.

दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *