IND vs ENG 2nd Test: सरफराज की पाटीदार रोहित शर्मा कोणाला देणार संधी? समोर आले मोठे अपडेट..

IND vs ENG 2nd Test: सरफराज की पाटीदार रोहित शर्मा कोणाला देणार संधी? समोर आले मोठे अपडेट..

IND vs ENG 2nd Test: भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मते, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी रजत पाटीदार आणि सरफराज खान यांच्यातील निवड करणे ‘कठीण’ असेल. शुक्रवारपासून होणारा हा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करू इच्छितो. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यातील पराभव आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांना दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आल्याने भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे.

IND vs ENG 2nd Test: सरफराज की पाटीदारमध्ये कोणाला मिळणार संधी?

विराट कोहली मालिकेच्या पहिल्या दोन कसोटींसाठी आधीच अनुपलब्ध आहे. अशा परिस्थितीत सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश करणे निवडकर्त्यांना भाग पडले. रजत पाटीदार आधीच संघाचा एक भाग आहे. सरफराज खान, सौरभ कुमार आणि रजत पाटीदार यांनी टीम इंडियासाठी डेब्यू केलेला नाही.

IND vs ENG 2nd Test: विशाखापट्टणमध्ये दुसरा कसोटी सामना उद्यापासून.. 4 फिरकीपटूसह मैदानात उतरू शकते टीम इंडिया, असी असू शकते भारताची प्लेईंग 11

याबद्दल बोलतांना टीम इंडियाचे  फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठौर म्हणाले, ‘ही निवड कठीण असेल. सरफराज संघाला ताकद पुरवणारा खेळाडू आहे. तो एक विलक्षण खेळाडू आहे. गेल्या काही वर्षांत त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये किती चांगली कामगिरी केली आहे हे आपण पाहिले आहे.

विक्रम राठोड म्हणाले, ‘त्यापैकी एकाचीच निवड करायची असेल तर नक्कीच अवघड जाईल. हा निर्णय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा घेतील.परिस्थिती लक्षात घेऊन प्लेइंग इलेव्हनचा निर्णय घेतला जाईल.

पुढे बोलतांना विक्रम राठोड म्हणाले की, ‘सध्या खेळपट्टी बद्दल  काहीही सांगणे कठीण होईल. फिरकीपटूंना येथे मदत मिळू शकते असा अंदाज आहे मात्र कदाचित सामन्याच्या दिवशी  परिस्थिती याच्याविरुद्ध ही असू शकते.

IND vs ENG पहिल्या कसोटी मधील पराभवामुळे WTC गुणतालिकेत भारत घसरला पाचव्या स्थानावर

IND vs ENG 2nd Test: सरफराज की पाटीदार रोहित शर्मा कोणाला देणार संधी? समोर आले मोठे अपडेट..

हैदराबाद कसोटी सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यातून संघाला दमदार पुनरागमन करायचे आहे. त्या पराभवातून सावरून संघाला पुढे जाण्याची गरज असल्याचे विक्रम राठोड म्हणाले. विक्रम राठोड म्हणाले, पराभवाची निराशा कायम ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक सामन्यातून तुम्ही काहीतरी शिकता. साहजिकच त्या सामन्यात आम्ही फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही खूप चर्चा करतो आणि एकमेकांची मते ऐकतो. पुढच्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करू अशी आशा आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *