IND vs ENG: रजत पाटीदार नाही तर ‘हे’ 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी खेळण्यास पात्र होते, एक तर राहुल द्रविडशी पंगा घेतल्याने बाहेर

IND vs ENG: रजत पाटीदार नाही तर 'हे' 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी खेळण्यास पात्र होते, एक तर राहुल द्रविडशी पंगा घेतल्याने बाहेर

IND vs ENG:   भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरवात झाली आहे. या मालिकेसाठी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीलाही संघाचा भाग बनवण्यात आले होते. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच त्याने वैयक्तिक कारणांमुळे अआप्ले नाव कमी केले.आता त्याच्या जागी रजत पाटीदारचा टीम इंडियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

मात्र, विराटच्या अनुपस्थितीनंतर पाटीदार नव्हे तर ‘हे ‘तीन खेळाडू टीम इंडियाचे प्रबळ दावेदार होते. या खेळाडूंनी आपल्या अलीकडच्या कामगिरीने खूप प्रभावित केले आहे, तरीही या खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. नक्को कोण आहेत ते 3 खेळाडू जाणून घेऊया या लेखाच्या माध्यमातून..

Untitled 1 41

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात हे 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी खेळण्यास पात्र होते.

सरफराज खान (Sarfraz Khan)

या यादीत पहिले नाव सरफराज खानचे आहे, ज्याने 2022-23 रणजी ट्रॉफीमध्ये 6 सामन्यांच्या 9 डावात 92 च्या सरासरीने 556 धावा केल्या, त्यानंतर त्याने दक्षिणेकडील भारत अ संघासाठी 68 धावांची खेळी केली. शिवाय त्याने टीम इंडियाकडून आफ्रिका दौरा खेळला होता. इंग्लंड लायन्सविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सरफराजने ९६ धावा केल्या होत्या, याशिवाय दुसऱ्या सामन्यातही त्याने दुसऱ्या डावात ५५ धावा केल्या होत्या. असे असूनही त्याला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली नाही.

इशान किशन (Ishan Kishan)

IND vs ENG: रजत पाटीदार नाही तर 'हे' 3 खेळाडू विराट कोहलीच्या जागी खेळण्यास पात्र होते, एक तर राहुल द्रविडशी पंगा घेतल्याने बाहेर

 

टीम इंडियापासून दूर असलेल्या इशान किशनलाही विराटच्या जागी टीम इंडियामध्ये स्थान मिळू शकले असते. 2023 मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याला पहिल्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. त्यानेही खूप प्रभावित केले आणि दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 52 धावांची नाबाद खेळी खेळली.

याशिवाय ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतही त्याने चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात त्याने 58 धावांची खेळी केली आणि दुसऱ्या सामन्यात 52 धावा केल्या. असे असतानाही त्याची भारतीय कसोटी संघात विराट कोहलीच्या जागी निवड झाली नाही. यामागचे सर्वात मोठे कारण त्याच्या आणि संघ व्यवस्थापनातील तणाव असल्याचे मानले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जेव्हा ईशान किशनने मानसिक तणावासाठी विश्रांतीसाठी विचारले, तेव्हा व्यवस्थापनाला त्याचे म्हणणे आवडले नाही. यानंतर राहुल द्रविडने त्याला रणजी खेळण्यास सांगितले. पण 19 जानेवारीपासून सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीत इशान गायब होता.

इंगलैंड लायंस 152 पर ऑल आऊट, देवदत्त पडिक्कल तेजतर्रार शतक के करीब -  england lions all out on 152 devdutt padikkal close to a century-mobile

देवदत्त पडिक्कल (Devdatt padikkal)

कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल आजकाल रणजी ट्रॉफीमध्येही  दिसत आहे. त्याने अलीकडेच पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 193 धावांची इनिंग खेळली होती. याशिवाय गोव्याविरुद्ध त्याने 103 धावा केल्या होत्या. पडिक्कलने आतापर्यंत खेळलेल्या 3 रणजी सामन्यांमध्ये 369 धावा केल्या आहेत. अशा स्थितीत तो रजत पाटीदारपेक्षा चांगला पर्याय ठरू शकला असता. पडिक्कलने आतापर्यंत भारतासाठी फक्त 2 टी-20 सामने खेळले आहेत, आता हे स्पष्ट झाले आहे की त्याला कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *