IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीसाठी राजकोटला रवाना झाला कर्णधार रोहित शर्मा, नवीन हेअर स्टाईल पाहून चाहते झाले हैराण; पहा व्हायरल व्हिडीओ.

Untitled 1 59

IND vs ENG 3rd Test: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी (IND vs ENG) राजकोटला गेला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी संपल्यानंतर भारत आणि इंग्लंड संघाचे खेळाडू सुमारे 10 दिवसांच्या विश्रांतीवर होते. भारतीय संघ व्यवस्थापनाने मेन इन ब्लूला 11 फेब्रुवारीला राजकोटला पोहोचण्याची आधीच माहिती दिली होती, त्यामुळे बरेच खेळाडू तिथे पोहोचले असावेत.

IND vs ENG 3rd Test: रोहित शर्माची नवीन हेअरस्टाईल व्हायरल.

भारतीय कर्णधार रोहित शर्माही रविवारी सकाळी राजकोटसाठी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. जिथे मीडिया कर्मचाऱ्यांनी त्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तिसऱ्या कसोटीत ‘हिटमॅन’ नव्या हेअरस्टाईलमध्ये दिसणार आहे.

IND vs ENG 3rd Test: तिसऱ्या कसोटीसाठी राजकोटला रवाना झाला कर्णधार रोहित शर्मा, नवीन हेअर स्टाईल पाहून चाहते झाले हैराण; पहा व्हायरल व्हिडीओ.

 

इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 28 धावांनी जिंकला होता. त्याचवेळी रोहित शर्मा अँड कंपनीने दुसरी कसोटी १०६ धावांनी जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता दोन्ही संघ तिसरी कसोटी जिंकून मालिकेत २-१ अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करतील.

IND vs AUS :”ये दुखः काहे खतम नही होता बे..” एका वर्षात ऑस्ट्रोलीयाने 3 वेळा भारताचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न मोडले, U19 विश्वचषकातही टीम इंडियाचा पराभव..

या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघाचा संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे. अनुभवी फलंदाज विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे हे तीन सामने खेळणार नाही. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातही तो खेळला नाही. त्याचवेळी रवींद्र जडेजा आणि केएल राहुलचे पुनरागमन झाले आहे. युवा गोलंदाज आकाश दीपचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

पहा रोहित शर्माचा व्हायरल व्हिडीओ .

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *