IND vs ENG 5th Test: रोहित आणि कंपनीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, धरमशाला कसोटी जिंकली तर मोडणार ‘हा’ 112 वर्षाचा विक्रम..

IND vs ENG 5th Test: रोहित आणि कंपनीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, धरमशाला कसोटी जिंकली तर मोडणार 'हा' 112 वर्षाचा विक्रम..

IND vs ENG 5th Test: भारतात सध्या टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये 5कसोटी सामन्याची मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील 4सामने खेळवले गेले असून शेवटचा कसोटी सामना 7 मार्च पासून धरमशाळा येथे खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. संघाने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली देखील आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 3-1 ने आघाडीवर आहे.

पहिल्या ४ पैकी ३ कसोटी जिंकून टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी इंग्लंडच्या  बेसबॉलमध्ये  धुमाकूळ घातला आहे. आता भारतीय संघाची नजर धर्मशाला कसोटीत विजयाकडे आहे. टीम इंडिया 2017 नंतर येथे कसोटी सामने खेळणार आहे. गेल्या वेळी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ गडी राखून विजय मिळवला होता. त्यानंतर येथे एकही कसोटी खेळली गेली नाही. आता क्रिकेटचा सर्वात मोठा फॉरमॅट येथे परतत असल्याने चाहत्यांना संघाचा विजय पाहायचा आहे.

IND vs ENG LIVE: भारतीय कर्णधार रोहित शर्माने घातली मोठ्या विक्रमाला गवसणी, ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विक्रम केला नावावर..!

रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने जबरदस्त पुनरागमन केले.

या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंड संघाने बाजी मारली होती. त्यानंतर विराट कोहली आणि मोहम्मद शमीसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय संघात पुनरागमन करणे कठीण जाईल, असे बोलले जात होते. अनेक प्रश्न उपस्थित झाले, पण रोहित शर्माचा संघ मागे हटला नाही. पुढचे तीन सामने जिंकून त्याने इंग्लंडचा पराभव केला. भारताने मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली असून आता संघ ४-१ अशा फरकाने मालिका संपवण्याचा प्रयत्न करेल.

पाचवी कसोटी जिंकून भारत विशेष कामगिरी करेल.

भारतीय संघाने धरमशाला येथील चौथा सामना जिंकल्यास एका विशेष विक्रमाची बरोबरी होईल. आतापर्यंत, कसोटी इतिहासात असे केवळ 3 वेळा घडले आहे जेव्हा एखाद्या संघाने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर 4-1 अशा फरकाने मालिका जिंकण्यात यश मिळविले आहे. इंग्लंडने 112 वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती. योगायोगाने आता भारत त्याच्याविरुद्ध हा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडने 1912 मध्ये ही कामगिरी केली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने दोनदा अशी कामगिरी केली आहे. 1897/98 आणि 1901/02 मध्ये 5 कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर त्यांनी मालिका 4-1 ने जिंकली.

IND vs ENG

मालिकेत आतापर्यंत काय घडलंय?

हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने २८ धावांनी जिंकली. त्यानंतर भारताने पुनरागमन केले. टीम इंडियाने विशाखापट्टणममधील दुसरी कसोटी 106 धावांनी जिंकली. राजकोटमधील तिसरी कसोटी त्याने 434 धावांनी जिंकली. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने पाच गडी राखून विजय मिळवला. भारताने घरच्या मैदानावर सलग १७वी मालिका जिंकली. आता धरमशाळा कसोटी जिंकून टीम इंडिया हा विक्रम आपल्या नावावर करू शकते का नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

IND vs ENG 5th Test: रोहित आणि कंपनीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, धरमशाला कसोटी जिंकली तर मोडणार 'हा' 112 वर्षाचा विक्रम..

IND vs ENG 5 व्या कसोटी साठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *