IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे होणार आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर इंग्लंड संघ मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच विशाखापट्टणम कसोटीतून बाहेर झाला आहे. कॅप्टन बेन स्टोक्सने ही माहिती दिली.
हैदराबाद कसोटीत जॅक लीचने शानदार गोलंदाजी केली, कमी विकेट्स घेतल्या तरीही त्याने भारतीय फलंदाजांवर दडपण आणण्याचे चांगले काम केले. वास्तविक, पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे जॅक लीच आता विशाखापट्टणम कसोटीत प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. स्काय स्पोर्ट्सवर माहिती देताना इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की, दुर्दैवाने जॅक लीच गुडघ्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडेल.
स्टोक्स पुढे म्हणाले की, सध्या जॅक लीच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे, त्याची दुखापत फारशी गंभीर नाही. जॅक लवकरच आमच्यात सामील होईल. जॅक लीचला आधीच गुडघ्याचा त्रास होता. पहिल्या सामन्यातही त्याला फारशी गोलंदाजी करायला लावले नाही. हैदराबाद कसोटीच्या दुसऱ्या डावात जॅकने केवळ 10 षटके टाकली होती. यादरम्यान त्याने श्रेयस अय्यरची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
IND vs ENG: शोएब बशीर संघात प्रवेश करणार .
इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज शोएब बशीर व्हिसा वादामुळे हैदराबाद कसोटीत खेळू शकला नाही. पण नंतर शोएब भारतात पोहोचला. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात शोएब बशीर जॅक लीचच्या जागी खेळताना दिसणार आहे. असे झाल्यास शोएब बशीर भारतीय संघाविरुद्ध कसोटी पदार्पण करेल.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता