IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना आजपासून हैद्राबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने या सामन्यात प्रथम नाणेफेक गमावून गोलंदाजीला सुरवात केली आहे.भारताचे दोन स्टार फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन ही जोडी भारतीय संघासाठी अनेक वर्षांपासून आश्चर्यकारक कामगिरी करत आहे.
ही जोडी आता टीम इंडियाच्या दोन दिग्गजांना मागे टाकून भारताची नंबर 1 जोडी बनली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जडेजा आणि अश्विनच्या जोडीने ५०२ कसोटी बळींचा आकडा गाठला आणि हरभजन-कुंबळे या प्रसिद्ध जोडीला मागे टाकले आहे.
IND vs ENG:भारतीय फिरकीपटूपुढे इंग्लंडच्या सलामीवीरांनी टाकली नांगी.
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली. हैदराबाद कसोटीत भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करत आहे आणि इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरला. जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी बेसबॉलचा झगमगाट दाखवला आणि जोरदार सुरुवात केली. जेव्हा इंग्लंडच्या फलंदाजांपुढे भारतीय वेगवान गोलंदाज निष्प्रभ दिसत होते तेव्हा कर्णधार रोहित शर्माने फिरकी गोलंदाजांना पाचरन केले. अश्विन आणि जडेजा येताच त्यांनी इंग्लंडला 5 धावांच्या आत तीन धक्के दिले. या जोडीने मिळून कसोटी क्रिकेटमध्ये ५०२ बळी पूर्ण केले आहेत. भारतीय संघाकडून अशी कामगिरी करणारी ही पहिली जोडी ठरली आहे.
रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५०३ विकेट्स घेतल्या आहेत (इंग्लंडने ३ विकेट गमावेपर्यंत). हैदराबादची कसोटी सुरू असून हा आकडा आणखी पुढे जाऊ शकतो. याआधी भारताची सर्वात यशस्वी जोडी हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे यांनी मिळून ५०१ विकेट्स घेतल्या होत्या. रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने आता ५०१ चा आकडा पार करत ५०२ चा जादुई आकडा गाठला आहे. या जोडीमध्ये आतापर्यंत अश्विनने 276 तर जडेजाने 227 विकेट्स घेतल्या आहेत.
-
भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेणारी जोडी
-
रवींद्र जडेजा-रविचंद्रन अश्विन: ५०३ बळी*
-
अनिल कुंबळे-हरभजन सिंग: ५०१ विकेट्स
-
हरभजन सिंग-झहीर खान: ४७४ विकेट्स
-
रविचंद्रन अश्विन-उमेश यादव : ४३१ बळी
-
अनिल कुंबळे-जवागल श्रीनाथ: ४१२ विकेट्स
हेही वाचा: