IND vs ENG: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG} यांच्यात सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताला यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) च्या रूपात एक नवा स्टार खेळाडू मिळाला आहे. वीरेंद्र सेहवागची आक्रमकता आणि सौरभ गांगुली याच्यासारखे मोठे-मोठे फटके मारण्याचे ताकद यशस्वीकडे आहे. नव्या दमाच्या या खेळाडूने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत नव-नवीन विक्रमांचे मनोरे रचले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगात 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याने 1000 धावा पूर्ण करण्यासाठी केवळ नऊ सामने खेळले आहेत.
IND vs ENG: यशस्वी जयसवालने रचला इतिहास.
22 वर्षे यशस्वी ने आपल्या खेळने सर्वांनाच प्रभावित केले आहे. यापूर्वी हा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर होता त्याने 11 कसोटी सामन्यात 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी यांना 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 12 सामने लागले.तर मयंक अग्रवाल आणि सुनील गावस्कर यांना 1000 धावा पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 12 व 11 सामने खेळावे लागले.
2023-24 या वर्षात आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. कसोटी खेळण्यापूर्वी यशस्वी ला 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 29 धावांची गरज होती. त्याने काल दमदार अर्धशतकीय खेळी करत हा विक्रम आपल्या नावे केला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात (Indian Cricket Team) खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत यशस्वीने आतापर्यंत अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्याचे हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात शतक हुकले होते. निराश न होता या युवा फलंदाजाने विशाखापट्टणममध्ये पहिल्या डावात तडाखेबाज द्विशतक झळकावले आणि त्यानंतर राजकोट कसोटीच्या दुसऱ्या डावात दमदार द्विशतक ठोकले. अशाप्रकारे यशस्वी जैस्वाल ही इंग्लंडविरुद्ध सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतक झळकावणारी पहिला भारतीय ठरला.
भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या या कसोटी मालिकेत भारताने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. धर्मशाळा येथे सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात देखील भारत आघाडीवर आहे. पहिल्या कसोटीत मात्र भारताचा इंग्लंड कडून निसटता पराभव झाला होता. त्यानंतर भारताने जोरदार कमबॅक करत मालिकेत विजय मिळवला. भारताने हा सामना जिंकला तर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत पहिल्या स्थानावर ती आपले स्थान कायम राखेल.
यापूर्वी 2014 साली दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतात झाली होती तेव्हा इंग्लंडने भारताला 4-1अशा फरकाने हरवले होते. महेंद्रसिंग धोनी च्या नेतृत्वाखाली खेळत असताना देखील भारताचा पराभव झाला होता. त्या पराभवाचा बदला भारताने या मालिकेत घेतला, असे म्हटले तरी हरकत नाही.
विशेष म्हणजे या कसोटी मालिकेमध्ये भारत विराट विना खेळत आहे. विराट कोहली ने मालिका सुरू होण्यापूर्वी कौटुंबिक कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली होती. विराट कोहलीच्या संघात नसल्याने कोणताही फरक भारतीय संघावर झाला नाही. विराटच्या गैरहजरीत भारतीय संघाने पाच नव्या दमाच्या खेळाडूंना आजमावून पाहिले आहे. या सर्वच खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
आयपीएलच्या इतिहासात ऑरेंज कॅप मिळवणारा हा आहे पहिला विदेशी खेळाडू!
एकाच मैदानावर सर्वाधिक धावा करणारी हे आहेत खेळाडू! वाचा विराटला कोणते मैदान ठरले लकी