IND vs ENG: तिसऱ्या कसोटी आधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा सामनावीर गोलंदाज पडला संघातून बाहेर…

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी आधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा सामनावीर गोलंदाज पडला संघातून बाहेर...

IND vs ENG: विशाखापट्टणममध्ये इंग्लंडला हरवून टीम इंडियाने कसोटी मालिकेत पुनरागमन केले आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या विजयाचा तारा ठरला, त्याने सामन्यात 9 विकेट्स घेत इंग्लंडचा पराभव निश्चित केला. बुमराहने सामन्यातील शेवटची विकेट घेत सामना संपवला. त्याच्या या शानदार कामगिरीनंतर लवकरच तो पुढील कसोटी सामन्यातून बाहेर पडण्याची मोठी बातमी आली आहे. होय, बुमराहला पुढील कसोटी सामन्यात खेळणे कठीण आहे.

सोमवारी, 5 फेब्रुवारीला विशाखापट्टणम कसोटीच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाने दुसऱ्या डावात इंग्लंडला 292 धावांवर रोखून सामना जिंकला. हैदराबाद कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियाच्या या पुनरागमनाने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. टीम इंडियाच्या या विजयात बुमराह स्टार ठरला. बुमराहने फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवरही पहिल्या डावात सर्वाधिक 6 बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले होते.

IND vs ENG:"मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये.." दुसऱ्या दिवसातील कामगिरीबद्दल जसप्रीत बूमराहने केला मोठा खुलासा, ओली पोपच्या क्लीन बोल्डवर ही केले वक्तव्य..

सामन्याच्या चौथ्या दिवशीही भारताच्या दिग्गज वेगवान गोलंदाजाची ताकद दिसून आली आणि पहिल्या सत्राच्या शेवटच्या षटकात त्याने जॉनी बेअरस्टोला एलबीडब्ल्यू आऊट करून इंग्लंडच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का दिला, तर बेन फॉक्सच्या चेंडूवर त्याने त्याचा झेल घेतला. त्याचाच चेंडू आणि पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.. भारतीय वेगवान गोलंदाजाने सामन्यातील शेवटची विकेट घेतली आणि अशाप्रकारे सामन्यात सर्वाधिक 9 विकेट घेतल्याने त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

IND vs ENG : जसप्रीत बूमराह पुढील कसोटी सामन्यातून होऊ शकतो बाहेर..

या सगळ्यात मोठी बातमी म्हणजे जसप्रीत बूमराहला पुढील कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, निवड समिती आणि संघ व्यवस्थापन राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापासून विश्रांती देऊ शकतात. ही मालिका 5 सामन्यांची आहे आणि अशा परिस्थितीत प्रत्येक सामना खेळताना बुमराहच्या फिटनेसवर परिणाम होण्याची भीती आहे, जो धोका टीम इंडियाला घ्यायचा नाही. अशा स्थितीत त्याला शेवटच्या 2 कसोटींसाठी फ्रेश ठेवण्यासाठी पुढील कसोटीतून विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीमध्ये बूमराहने  सर्वाधिक गोलंदाजी केली.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटी आधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा सामनावीर गोलंदाज पडला संघातून बाहेर...

या सामन्याच्या दोन्ही डावात बुमराहने जवळपास 33 षटके टाकली होती, जी टीम इंडियाच्या इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा जास्त आहे. संघाच्या तिन्ही फिरकीपटूंनीही बुमराहपेक्षा कमी गोलंदाजी केली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने 30 षटके, कुलदीप यादवने 32 षटके आणि अक्षर पटेलने 18 षटके टाकली. तर मुकेश कुमारला फक्त 12 षटके टाकता आली. इतकेच नाही तर पहिल्या कसोटीत बुमराहने जवळपास 25 षटके टाकली होती.

बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज पुढील कसोटीत टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून पुनरागमन करू शकतो. सिराजला दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली. मोहम्मद शमी या मालिकेतून पूर्णपणे बाहेर असण्याची शक्यता आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Under 19 World Cup 2024:  सुपर 4 संघ झाले निच्छित.. आता या देशासोबत सेमीफायनल खेळणार भारतीय संघ, पहा सर्व वेळापत्रक एका क्लिकवर.

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *