IND vs ENG:”मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये..” दुसऱ्या दिवसातील कामगिरीबद्दल जसप्रीत बूमराहने केला मोठा खुलासा, ओली पोपच्या क्लीन बोल्डवर ही केले वक्तव्य..

0

IND vs ENG:  सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने भारतीय संघासाठी शानदार गोलंदाजी करत 6 बळी घेतले.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला आपल्यावर वर्चस्व गाजवू दिले नाही आणि ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराहने जो रूट, ऑली पोप, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, रेहान अहमद आणि टॉम हार्टली यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सामना संपल्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याच्या गोलंदाजीबाबत मोठा खुलासा केला.

IND vs ENG Test Series: उद्यापासून सुरु होणार भारत-इंग्लंड कसोटी मालिका, पहा पहिला सामना कधी कुटे किती वाजता होणार सुरु? कुठे पाहू शकता लाईव्ह..

दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर, बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये बोलतांना टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला,

‘मी रिव्हर्स स्विंग सेटअप आणि दिग्गज गोलंदाजांचे जादू पाहून मोठा झालो आहे. या गोष्टीने मला खूप प्रभावित केले आहे. त्यामुळे जेव्हा गंभीर क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा मी माझ्या ताकदीने फलंदाज आणि गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. मी लहानपणापासून हे पाहिले आहे आणि आता मी माझ्या कामगिरीने खूप आनंदी आहे.

पुढे बोलतांना बूमराह म्हणाला की, 

तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा रिव्हर्स स्विंग महत्त्वाची भूमिका बजावते. माझा जन्म याच देशात झाला आणि मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रिव्हर्स स्विंग खूप शिकलो आहे. रिव्हर्स स्विंगमध्ये मी विकेट घेतल्याने बरे वाटते.

IND vs ENG: जसप्रीत बुमराहने ओली पोपच्या विकेटबाबत केले मोठे वक्तव्य..

IND vs ENG:"मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये.."  दुसऱ्या दिवसातील कामगिरीबद्दल जसप्रीत बूमराहने केला मोठा खुलासा, ओली पोपच्या क्लीन बोल्डवर ही केले वक्तव्य..

जसप्रीत बुमराह पुढे म्हणाला,

‘ओली पोपच्या विकेटनंतर माझी नजर इनस्विंग बॉलवर होती. फलंदाजाच्या बॅटला आदळल्यानंतर चेंडू नक्कीच स्लिपमध्ये जाईल, अशी माझी अपेक्षा होती आणि तेच घडले. मला माझ्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावता आली हे चांगले वाटते.

भारताने पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावून 396 धावा केल्या होत्या तर इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर आटोपला होता. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या होत्या.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave A Reply

Your email address will not be published.