IND vs ENG: तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघासाठी चिंतेची बातमी, ‘हा’ स्टार गोलंदाज सरावासाठी नाही उतरला मैदानात; कसोटीमधूनही होऊ शकतो बाहेर..!

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघासाठी चिंतेची बातमी, 'हा' स्टार गोलंदाज सरावासाठी नाही उतरला मैदानात; कसोटीमधूनही होऊ शकतो बाहेर..!

IND vs ENG: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मंगळवारी संघाच्या सराव सत्रात दिसला नाही. वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह अद्याप तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी राजकोटला पोहोचलेला नाही आणि त्यामुळेच तो या सराव सत्राचा भाग नव्हता.

क्रिकबझमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह मंगळवारी संध्याकाळपर्यंत राजकोटला पोहोचणे अपेक्षित होते आणि जर तो पोहोचला असेल तर बुधवारी तो संघासोबत सराव करताना दिसला. याआधी बुमराहला तिसऱ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि संघाची घोषणा झाल्यावर बुमराहचा उपकर्णधार म्हणून समावेश करण्यात आला.

IND vs ENG : केएल राहुल- रवींद्र जडेजाची भारतीय संघात इंट्री, विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर; तिसऱ्या कसोटीसाठी असा असू शकतो भारतीय संघ.

IND vs ENG:  जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते.

जसप्रीत बुमराहला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती दिली जाऊ शकते अशीही बातमी होती. याचे मोठे कारण समोर आले आहे. धर्मशाला येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटी सामन्यासाठी बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असावा, अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा आहे आणि त्यामुळेच त्याला चौथ्या कसोटी सामन्यातून विश्रांती देण्यात येईल.

विशाखापट्टणम कसोटी सामन्यात भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचे योगदान महत्त्वाचे होते. त्याने दोन्ही डावात विकेट्स घेतल्या. बुमराहने पहिल्या डावात 45 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावातही त्याने 46 धावांत 3 बळी मिळवले होते. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावात मिळून ९/९१ चे आकडे नोंदवले होते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल तो मालिकेत पुढे जाईल.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघासाठी चिंतेची बातमी, 'हा' स्टार गोलंदाज सरावासाठी नाही उतरला मैदानात; कसोटीमधूनही होऊ शकतो बाहेर..!

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी भारताचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीप.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *