IND vs ENG live: पहिला कसोटी सामना सुरु होताच टीम इंडियामधून आवेश खानला सुट्टी, आता थेट रणजी खेळणार; समोर आले मोठे कारण..

IND vs ENG live: पहिला कसोटी सामना सुरु होताच टीम इंडियामधून आवेश खानला सुट्टी, आता थेट रणजी खेळणार; समोर आले मोठे कारण..

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सुरू होताच वेगवान गोलंदाज आवेश खानला भारतीय कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात हैदराबादमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध नाणेफेक गमावली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेईंग 11 ची घोषणा करतांना कर्णधार रोहित शर्माने रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांना मैदानात उतरवले आहे. तर कर्णधार रोहित शर्माने वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची निवड केली आहे.

IND vs ENG Test Series: उद्यापासून सुरु होणार भारत-इंग्लंड कसोटी मालिका, पहा पहिला सामना कधी कुटे किती वाजता होणार सुरु? कुठे पाहू शकता लाईव्ह..

IND vs ENG: आवेश खान टीम इंडियातून का बाहेर झाला?

हैदराबादच्या फिरकी ट्रॅकवर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची गरज नव्हती, अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आवेश खानला पुढील रणजी सामना खेळण्यासाठी पाठवले आहे. मध्य प्रदेश.. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजांमध्ये कर्णधार रोहित शर्माची पहिली पसंती होते, त्यामुळे आवेश खानला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. ही बाब लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने आवेश खानला रणजी सामना खेळण्यासाठी पाठवले.

IND vs ENG live: पहिला कसोटी सामना सुरु होताच टीम इंडियामधून आवेश खानला सुट्टी, आता थेट रणजी खेळणार; समोर आले मोठे कारण..

IND vs ENG:विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदार..

याशिवाय इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी मध्य प्रदेशचा फलंदाज रजत पाटीदारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी विराट कोहलीच्या जागी रजत पाटीदार भारतीय संघात  दाखल झाला आहे.

IND vs ENG live: पहिला कसोटी सामना सुरु होताच टीम इंडियामधून आवेश खानला सुट्टी, आता थेट रणजी खेळणार; समोर आले मोठे कारण..

विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाही. 30 वर्षीय पाटीदारने इंग्लंड लायन्सविरुद्ध भारत अ संघाकडून खेळताना 111 आणि 151 धावा केल्या आहेत. मात्र, त्याला कसोटी पदार्पणाची वाट पाहावी लागणार आहे. पाटीदारने पार्लमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले आणि 22 धावा केल्या. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने तीन फिरकीपटूंना मैदानात उतरवले आहे.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *