IND vs ENG LIVE:  देवदत्त पडीकलचे कसोटीमध्ये पदार्पण, इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाळा कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ..

IND vs ENG LIVE:  देवदत्त पडीकलचे कसोटीमध्ये पदार्पण, इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाळा कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ..

IND vs ENG LIVE:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना धर्मशाला येथे खेळला जात आहे. या सामन्यातून देवदत्त पडिक्कलने कसोटी पदार्पण केले आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करणारा देवदत्त हा पाचवा खेळाडू ठरला आहे.

धरमशाला कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रादरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू जखमी झाला होता. त्यानंतर आता पडिक्कलचे नशीब उघडले आहे. होय, आम्ही रजत पाटीदारबद्दल बोलत आहोत. नाणेफेकीनंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, रजत पाटीदारला एक दिवस आधी सराव करताना दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला धर्मशाला कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आले आहे आणि देवदत्त पडिक्कलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

IND vs ENG मालिकेत 5 खेळाडूंनी पदार्पण केले आहे

भारताकडून पाच खेळाडूंनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत कसोटी पदार्पण केले आहे. या मालिकेत टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण करणारा पडिक्कल हा पाचवा खेळाडू आहे. पडिक्कलपूर्वी रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल आणि आकाश दीप यांनी पदार्पण केले आहे.

टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन

IND vs ENG LIVE:  देवदत्त पडीकलचे कसोटीमध्ये पदार्पण, इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाळा कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ..

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंडचा प्लेइंग इलेव्हन

बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, ऑली पोप, बेन डकेट, जो रूट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *