IND vs ENG Live: सरफराज खानला संधी नाही, रजत पाटीदारचे कसोटीमध्ये पदार्पण, दुसऱ्या कसोटीसाठी असी आहे भारताची प्लेईंग 11..

0
6
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IND vs ENG Live:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल पाहायला मिळाले. दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या सामन्यात दुखापत झाल्याने रवींद्र जडेजा आणि केएल राहुल दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहेत. त्यानंतर सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला. मात्र या तीन खेळाडूंपैकी एकाही खेळाडूचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. रजत पाटीदारची कसोटी मालिकेसाठी आधीच संघात निवड झाली होती, आता दुसऱ्या सामन्यासाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही स्थान देण्यात आले आहे.

IND vs ENG 2nd Test: सरफराज की पाटीदार रोहित शर्मा कोणाला देणार संधी? समोर आले मोठे अपडेट..

IND vs ENG: रजत पाटीदारला पदार्पणाची संधी मिळाली

विशाखापट्टणम कसोटीपूर्वी सर्फराज खान आणि रजत पाटीदार यांच्यापैकी एकाला दुसऱ्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, अशा बातम्या येत होत्या. आता चित्र स्पष्ट झाले असून सर्फराज खानला टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची पदार्पणाची कॅप मिळाली आहे.

 

यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रजत पाटीदारला टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. रजत पाटीदारने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.

 

IND vs ENG: सरफराजला पदार्पणाची संधी मिळाली नाही

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सरफराज खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर चाहत्यांना आशा होती की सरफराज खान कसोटी पदार्पण करू शकेल. मात्र आता सरफराज खानच्या चाहत्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सरफराजच्या जागी रजत पाटीदारला दुसऱ्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आता मालिकेच्या आगामी सामन्यांमध्ये सर्फराज खानलाही टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता