Ind vs Eng: रोहित शर्माच्या धमाकेदार अर्धशतकी खेळी आणि जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडवर धमाकेदार विजय मिळवला. लखनऊच्या इकाना स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng)यांच्यात सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला. विश्वचषकामध्ये भारताचा हा सलग सहावा विजय ठरला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे.
Ind vs Eng: इंग्लंडचा सलग 6 वा पराभव, विश्वचषक 2023 मधील आव्हान संपुष्टात..
Congratulations Team INDIA 🇮🇳
क्रिकेट विश्व कप में लगातर छठी जीत के लिए टीम इंडिया को ढेर सारी बधाई।#INDvsENG pic.twitter.com/EfNHbjoGVS
— Adv Harita Mehta (@AdvHaritamehta) October 30, 2023
इंग्लंडचा 6 सामन्यातला हा सलग पाचवा पराभव आहे. त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला. इंग्लंडचा संघ सध्या गुणतालिकेत दहाव्या क्रमांकावर आहे. या पराभवामुळे इंग्लंडच्या संघाला आता पॅकअप करावे लागणार आहे. हा संघ सेमी फायनलच्या रेस मधून पूर्णपणे बाहेर पडलेला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत भारताची अवस्था 3 बाद 40 अशी करून टाकली.
सलामीवीर शुभमन गिल हा 9 धावांवर बाद झाला. त्यानंतर जबरदस्त फॉर्मत असलेल्या विराट कोहली याला शून्य धावसंख्येवर माघारी पाठवले. आक्रमक फटका मारण्याच्या नादात श्रेयश अय्यर देखील चार धावांवर माघारी परतला. त्यानंतर के एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी डाव सावरत अर्धशतकीय भागीदारी केली. राहुलने 39 धावांची उपयुक्त खेळी केली.
रोहित शर्मा ने अर्धशतकी खेळी करत 10 चौकार आणि तीन षटकारसह 87 धावा काढल्या. शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने आक्रमक फटकेबाजी करत भारताची धावसंख्या 200 च्या पार नेली. सूर्यकुमार यादव 47 चेंडूत 49 धावा काढून बाद झाला. भारतीय संघाने 50 षटकात नऊ बाद 229 धावा केल्या. इंग्लंडकडून डेव्हिड विले यांनी तीन क्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्क वूड याला एक गडी बाद करण्यात यश आले.
प्रत्युत्तरात इंग्लंडने जबरदस्त सुरुवात केली. सलामीच्या जोडीने पहिल्या पाच षटकात 30 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने सहाव्या शतकात डेव्हिड मलान आणि जो रूट यांना लागोपाठ चेंडूवर बाद केले आणि इंग्लंडच्या तोंडून विजयाचा घास हिरावून घेतला. त्यानंतर मोहम्मद शमीने देखील जॉनी ब्रेयर्स्टो व बेन स्टोक्स यांना स्वस्तात माघारी धाडले. कुलदीपनेही आपल्या फिरकीची जादू दाखवत जोश बटलरला बाद केले. त्यानंतर जडेजा, बुमराह आणि शमी यांनी इंग्लंडची मधली फळी आणि शेवटचे शेपूट स्वस्तात गुंडाळले आणि भारताला 100 धावांनी विजय मिळवून दिला.
Ind vs Eng: जसप्रीत बुमराहने घेतले 3विकेट
भारताकडून जसप्रीत बुमराहने 32 धावा देत तीन गडी बाद केले. तर मोहम्मद शमी याने 22 धावा चार गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कुलदीप यादव याला दोन, रवींद्र जडेजाला एकमेव गडी टिपता आला तर मोहम्मद सिराज याचे खाते रिकामी राहिले. रोहित शर्मा याला सामनावीरचा किताब देण्यात आला.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी