IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

IND vs ENG 2nd Test: भारताने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत आपली पकड मजबूत केली आहे. युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या पहिल्या द्विशतकानंतर जसप्रीत बुमराहच्या शानदार स्विंग गोलंदाजीमुळे टीम इंडिया या सामन्यात आघाडीवर आहे.

भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दुसऱ्या डावात पाच षटकात बिनबाद २८ धावा केल्या आणि एकूण १७१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात कर्णधार रोहित शर्मा 13 धावांवर आणि पहिल्या डावात 209 धावा करणारा यशस्वी जैस्वाल 15 धावांवर फलंदाजी करत होता. आता रोहितला खेळाच्या तिसऱ्या दिवशी धोनीचा मोठा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

Ind vs Eng 1st test: पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माची मोठी चूक.. संघाला होऊ शकते नुकसान, या सामनावीर खेळाडूला केले संघातून बाहेर; चाहते भडकले..!

  IND vs ENG :धोनीचा खास विक्रम मोडण्यापासून रोहित शर्मा 2 पावले दूर.

रोहित शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 56 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत रोहित शर्माने 96 डावात 3828 धावा केल्या आहेत ज्यात 77 षटकारांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहितने 2 षटकार मारले तर तो भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एमएस धोनीला मागे टाकेल. एमएस धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी सामने खेळताना 78 षटकार ठोकले आहेत.

वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम धोक्यात.

भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. वीरेंद्र सेहवागने भारताकडून 104 कसोटी सामने खेळताना 91 षटकार ठोकले होते. रोहितला या विक्रमात वीरेंद्र सेहवागला मागे सोडायचे असेल तर , त्याला कसोटीत आणखी 15 षटकार मारावे लागतील. अशा परिस्थितीत इंग्लंडविरुद्ध खेळली जाणारी ही मालिका रोहित शर्मासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.

कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय खेळाडू (Most Sixes In Test Cricket)

  1. वीरेंद्र सेहवाग- 91 षटकार

  2. एमएस धोनी- 78 षटकार

  3. रोहित शर्मा- ७७ षटकार

  4. सचिन तेंडुलकर- ६९ षटकार

  5. कपिल देव- 61 षटकार

IND vs ENG: कर्णधार रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर.. धोनी- सेहवागचा मोठा विक्रम होणार ध्वस्त?

IND vs ENG: विशाखापट्टणम कसोटी सामन्याची स्थिती

विशाखापट्टणम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 396 धावांवर संपला. या डावात यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला 35 धावांचा टप्पा गाठता आला नाही. यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावांत गुंडाळले. या काळात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तर, कुलदीप यादवने तीन फलंदाजांना आपला बळी बनवले आणि अक्षर पटेलच्या नावावर 1 बळी राहिला.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *