IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

IND vs ENG most wicket taker bowler:   भारत आणि इंग्लंड यांच्यात हायप्रोफाइल कसोटी मालिका सुरू होईल तेव्हा, बॅट आणि बॉलची अतिशय रोमांचक लढाई होईल. 25 जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे, जिथे भारतीय संघ पहिल्या सामन्यात हैदराबादमध्ये इंग्लिश संघाशी भिडणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये पाच गोलंदाजांनी कहर केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत ते पाहूया.

ND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात या 5 गोलंदाजांनी घेतलेत सर्वाधिक विकेट्स.

1.जेम्स अँडरस

इंग्लंडचा स्टार वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध उत्कृष्ट विक्रम आहे. जेम्स अँडरसनने आतापर्यंत भारताविरुद्ध 35 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 24.89 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 139 विकेट्स घेतल्या आहेत. जेम्स अँडरसनने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात ६ वेळा ५ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये 690 विकेट घेतल्या आहेत.

IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

2.भागवत चंद्रशेखर

भारताचा माजी लेग स्पिनर ‘भागवत चंद्रशेखर’ने इंग्लंडविरुद्धच्या 23 कसोटी सामन्यात 27.27 च्या सरासरीने 95 बळी घेतले आहेत. भागवत चंद्रशेखरची इंग्लंडविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 107 धावांत 9 विकेट्स. भागवत चंद्रशेखरने भारतासाठी 58 कसोटी सामन्यात 242 विकेट घेतल्या आहेत.

3.अनिल कुंबळे

भारताचा माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेने इंग्लंडविरुद्धच्या १९ कसोटी सामन्यांमध्ये ३०.५९ च्या सरासरीने ९२ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने भारताकडून 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेने 35 वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि 8 वेळा एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत.

4.रविचंद्रन अश्विन

या यादीत टीम इंडियाचा स्टार गोलंदाज  ‘रविचंद्रन अश्विन’ चौथ्या क्रमांकावर आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 19 कसोटी सामन्यांमध्ये 28.59 च्या सरासरीने 88 बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विनने भारताकडून 95 कसोटी सामन्यांमध्ये 490 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये, रविचंद्रन अश्विनने 34 वेळा पाच विकेट घेतल्या आहेत आणि 8 वेळा एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

5.बिशनसिंग बेदी

बिशनसिंग बेदी यांनी इंग्लंडविरुद्धच्या 22 कसोटी सामन्यांमध्ये 29.87 च्या सरासरीने 85 बळी घेतले आहेत. बिशन सिंग बेदी यांनी भारताकडून 67 कसोटी सामन्यात 266 विकेट घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये बिशन सिंग बेदीने 14 वेळा 5 विकेट्स आणि एका मॅचमध्ये 10 विकेट्स घेतल्या आहेत.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

हेही वाचा:

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *