IND vs ENG Playing 11: इंग्लंडने खेळली मोठी चाल, एकदिवस आधीच केला संघ जाहीर; पहिल्या कसोटीमध्ये जखमी झालेला खेळाडू पुन्हा संघात दाखल..

IND vs ENG Playing 11: इंग्लंडने खेळली मोठी चाल, एकदिवस आधीच केला संघ जाहीर; पहिल्या कसोटीमध्ये जखमी झालेला खेळाडू पुन्हा संघात दाखल..

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून त्यासाठी इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. मोठी बातमी म्हणजे पहिल्या सामन्यात फ्लॉप झालेल्या खेळाडूला इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. रोहित शर्मा आणि कंपनीला याचा खूप फायदा होऊ शकतो.

IND vs ENG Playing 11: राजकोट कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे. मोठी बातमी म्हणजे या सामन्यासाठी इंग्लंडने आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. धक्कादायक निर्णय घेत इंग्लंडने पहिल्याच सामन्यात फ्लॉप  झालेल्या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड केली आहे.

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वांत छोटे कसोटी सामने, एक सामना तर केवळ एका तासाच्या आत संपला होता.

इंग्लंडने वेगवान गोलंदाज मार्क वुडला संघात स्थान दिले आहे. हा वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीत खेळला आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर त्याला विशाखापट्टणम कसोटीत वगळण्यात आले. इंग्लंडचा संघ एका वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसह दुसऱ्या कसोटीत उतरला होता पण राजकोट कसोटीसाठी त्यांनी दोन वेगवान गोलंदाजांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. स्टोक्सने ऑफस्पिनर शोएब बशीरला संघातून वगळले आहे.

 

  • IND vs ENG Playing 11: तिसऱ्या कसोटीसाठी  इंग्लंडचे प्लेइंग इलेव्हन

जॅक क्रोली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

बेन स्टोक्सने राजकोट कसोटीसाठी रोहित शर्माच्या चालीचा वापर केला आहे. टीम इंडिया मालिकेच्या पहिल्या सामन्यापासून दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे.

तर इंग्लंडने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फक्त एकच वेगवान गोलंदाज मैदानात उतरवला होता. मात्र, आता इंग्लंडने राजकोटमध्ये आपली रणनीती बदलली आहे. राजकोटची खेळपट्टी रँक टर्नर ठरणार नाही, असे सांगितले जात आहे. येथे सर्व गोलंदाजांसाठी काहीतरी असेल. विशेषत: वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळू शकते आणि मार्क वुडचा वेग इंग्लंडसाठी उपयुक्त ठरू शकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंग्लंडचा संघ राजकोटमध्ये केवळ दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरत आहे.

IND vs ENG Playing 11: इंग्लंडने खेळली मोठी चाल, एकदिवस आधीच केला संघ जाहीर; पहिल्या कसोटीमध्ये जखमी झालेला खेळाडू पुन्हा संघात दाखल..

IND vs ENG Playing 11: भारतीय संघातही मोठे बदल होणार ?

इंग्लंडच्या संघात बदल करण्यात आला असून टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. वृत्तानुसार, रवींद्र जडेजाला संघात संधी मिळणार आहे. त्याचवेळी ध्रुव जुरेल आणि सरफराज राजकोटमध्ये खेळणार हे निश्चित मानले जात आहे. तर युवा खेळाडूंपैकी रोहित शर्मा कोणत्या खेळाडूला पदार्पणाची संधी देतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *