IND vs ENG: तिसऱ्या कसोटीसाठी असी असू शकते टीम इंडिया, आजपर्यंतचा सर्वांत कमजोर भारतीय संघ उतरणार मैदानात..

0
11
ad

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यातील सुरु असलेल्या 5कसोटी मालिकेतून तिसरा सामना उद्यापासून खेळवला जाणार आहे. याआधी  झालेले दोन्ही सामने एक भारताने आणि एक इंग्लंड संघाने जिंकले आहेत.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (IND vs ENG) भारतीय संघाचे प्लेईंग इलेव्हन कोणते असेल? कर्णधार रोहित शर्मा कोणत्या युवा खेळाडूंना संधी देणार? सर्फराज खान राजकोटमध्ये कसोटी पदार्पण करू शकेल की नाही? केएस भरतला संघ व्यवस्थापनाकडून पाठिंबा मिळेल का? असे अनेक प्रश्न सध्या भारतीय क्रिकेट संघांच्या चाहत्यांना सतावत आहेत.

तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असेल हे जाणून घेण्यासाठी भारतीय चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. कारण या भारताचे काही खेळाडू दुखापतीमुळे पुढील सामन्यात सहभागी होणार नाहीत, तर रवींद्र जडेजाच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चला तर मग जाणून घेऊया तिसऱ्या सामन्यासाठी (IND vs ENG) भारताची प्लेइंग इलेव्हन काय असू शकते?

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियामधील आणखी एक प्रमुख खेळाडू वैयक्तिक कारण देऊन पडला संघातून बाहेर..

IND vs ENG: हा खेळाडू रोहित शर्मासोबत सलामी करू शकतो

टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्मा सलामीला येऊ शकतो. आतापर्यंतच्या मालिकेत त्याची बॅट शांत राहिली आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये (IND vs ENG) 90 धावा केल्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. त्याला साथ देण्यासाठी युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल मैदानात उतरू शकतो. तो आतापर्यंत मालिकेत प्रभावी दिसला आहे. चार डावात त्याने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 321 धावा केल्या. दोन्ही फलंदाज वेगवान डाव खेळून भारताला आक्रमक सुरुवात करून देऊ शकतात.

Viral Video: आयपीएलआधी आंद्रे रसेल भयंकर मूडमध्ये..ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजंची तुफानी धुलाई करत चोपल्या एवढ्या धावा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल.

IND vs ENG: टीम इंडियाच्या मधल्या फळीत बदल होणार .

हे आहेत क्रिकेटच्या इतिहासातील 5 सर्वांत छोटे कसोटी सामने, एक सामना तर केवळ एका तासाच्या आत संपला होता.

भारतीय संघाच्या मधल्या फळीत अनेक बदल होऊ शकतात. कारण केएल राहुलला राजकोट कसोटी सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. याशिवाय विराट कोहलीही वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून बाहेर आहे. या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे भारताच्या मधल्या फळीत नवीन फलंदाजांना संधी दिली जाऊ शकते.

युवा फलंदाज शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो, ज्याच्या शेवटच्या सामन्यातील शतकाने (IND vs ENG) त्याचे फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले. कर्णधार रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेटचे रन मशीन सरफराज खानला चौथ्या क्रमांकावर पाठवू शकतो. त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हा पहिलाच सामना असेल.

रजत पाटीदार पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, दुसऱ्या सामन्यात तो फ्लॉप ठरला. पण कर्णधार त्याला आणखी एक संधी देऊ इच्छितो. सरफराज खानशिवाय ध्रुव जुरेलही पदार्पण करू शकतो. केएस भरतला त्याच्या बॅक टू बॅक फ्लॉप कामगिरीमुळे वगळले जाऊ शकते. अशा परिस्थितीत त्याच्या जागी ध्रुव जुरेल प्रबळ दावेदार आहे.

IND vs ENG : केएल राहुल- रवींद्र जडेजाची भारतीय संघात इंट्री, विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर; तिसऱ्या कसोटीसाठी असा असू शकतो भारतीय संघ.

IND vs ENG: रवींद्र जडेजा  होऊ शकतो तिसऱ्या कसोटीमधून बाहेर..

पहिल्या कसोटी सामन्यानंतर (IND vs ENG), रवींद्र जडेजाला हॅमस्ट्रिंगची समस्या आली, ज्यामुळे त्याला दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडावे लागले. त्याच वेळी, त्याच्या फिटनेसबद्दल अद्याप कोणतेही अपडेट मिळालेले नाही. पण अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की तो तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.

असे झाल्यास अक्षर पटेलला संघाबाहेर जावे लागेल आणि जद्दू संघाचा पहिला अष्टपैलू खेळाडू असेल. मात्र, रवींद्र जडेजा न परतल्यास अक्षर पटेलला संघात स्थान दिले जाईल. याशिवाय रविचंद्रन अश्विन हा भारतीय संघाचा दुसरा अष्टपैलू खेळाडू असेल.

IND vs ENG: या खेळाडूंना गोलंदाजीत संधी मिळू शकते.

शेवटी, भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागाबद्दल बोलायचे झाले, तर त्यात बलवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे पुनरागमन होईल. कामाच्या ओझ्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली (IND vs ENG). यानंतर तो आता राजकोट कसोटी सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे ताजेतवाने मैदानात उतरेल. त्याच्या पुनरागमनामुळे मुकेश कुमारला संघाबाहेर राहावे लागणार आहे.

जसप्रीत बुमराह संघाचा दुसरा वेगवान गोलंदाज असेल. दुसऱ्या सामन्यात (IND vs ENG) टीम इंडियाच्या विजयाचा नायक जस्सी ठरला. त्याने आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाचा कहर केला आणि भारताच्या विजयाची गाथा लिहिली. कुलदीप यादव व्यतिरिक्त फिरकी गोलंदाजीची जबाबदारी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या खांद्यावर असेल.

IND vs ENG: तिसऱ्या कसोटीसाठी असी असू शकते टीम इंडिया, आजपर्यंतचा सर्वांत कमजोर भारतीय संघ उतरणार मैदानात..

IND vs ENG तिसऱ्या सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, सरफराज खान, रजत पाटीदार, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

Viral Video: सलग दुसऱ्यांदा SA20 लीगची ट्रॉफी जिंकल्यानंतर सनरायझर्सची मालकीण ‘काव्या मारन’ झाली भलतीच खुश, थेट एडन मार्करमला मारली कडाडून मिठी; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..