Ravi Ashwin Runout: भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना दोन दिवस खेळला गेला आहे. पहिल्या दिवशी भारतीय फिरकी त्रिकुटासमोर (अश्विन, अक्षर आणि जडेजा) इंग्लंडचे फलंदाज २४६ धावांत गडगडले. यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 421 धावा केल्या. भारताने या सामन्यात 175 धावांची आघाडी घेत आपली पकड मजबूत केली आहे. दुसऱ्या दिवशी अश्विन फारशी फलंदाजी करत नव्हता आणि 1 धावा करून धावबाद झाला. परंतु तो ज्या पद्धतीने धावबाद झाला, हे पाहून सर्वच जण चर्चा करत आहे.
जडेजाच्या चुकीमुळे रवीचंद्र आश्विन धावबाद?
ही घटना भारताच्या फलंदाजीच्या 91 व्या षटकात घडली. अश्विनने ओव्हरचा तिसरा चेंडू कव्हर्सच्या दिशेने ढकलला आणि एकेरी धाव घेतली. नॉन स्ट्रायकर एंडला उभा असलेला रवींद्र जडेजाही धावा घेण्यासाठी पुढे सरसावला, पण अचानक त्याचा विचार बदलला आणि तो परतला. यावेळी अश्विन नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचला होता. अशा स्थितीत अश्विनने माघारी जाण्याचा विचार करण्याआधीच क्षेत्ररक्षकाने चेंडू यष्टिरक्षकाकडे फेकला आणि अश्विन धावबाद झाला. आऊट झाल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ. (IND vs ENG: ravi ashwin runout video)
— The Game Changer (@TheGame_26) January 26, 2024
IND vs ENG: भारतीय फलंदाजांची तुफानी कामगिरी, दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ठोकल्या 421 धावा..
अष्टपैलू रवींद्र जडेजा (नाबाद 81) आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल (86 धावा) यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने शुक्रवारी (26 जानेवारी) पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सात गडी गमावून 421 धावा केल्या. . या सामन्यात भारताने 175 धावांची आघाडी घेत आपली पकड मजबूत केली आहे. मात्र, केएल राहुल शतक पूर्ण करण्यापासून 14 धावा दूर राहिला. तो 86 धावा करून बाद झाला. तर जडेजा ८१ धावा करून नाबाद परतला. जडेजाने 84 चेंडूत 20 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेल जडेजासोबत फलंदाजीसाठी उतरेल. अक्षर 35 धावा करून नाबाद आहे.
हेही वाचा: