IND vs ENG live:”शेर आखिर शेर होता है..!” रोहित शर्माने ठोकले शानदार शतक, जो रूट, एबी डिव्हीलीयर्स यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

IND vs ENG live:"शेर आखिर शेर होता है..!" रोहित शर्माने ठोकले शानदार शतक, जो रूट, एबी डिव्हीलीयर्स यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

Rohit Sharma 48th International Century: भारतीय कर्णधार रोहित शर्माने धर्मशाळा येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 12वे शतक झळकावले आहे. त्याने 154 चेंडूत शतक पूर्ण केला आहे.

यादरम्यान रोहितच्या बॅटमधून 13 चौकार आणि 3 षटकारही आले. रोहित शर्माचे हे 48 वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. या शतकासह रोहितने इंग्लंडचा दिग्गज खेळाडू जो रूट आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्स यांना मागे टाकले आहे. यासह त्याने राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.

IND vs ENG : रोहित शर्माच्या शतकीय खेळीमुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत!

रोहित शर्माने धर्मशाला येथे शतक झळकावून जो रूटला मागे ढकलले आहे, रूटच्या नावावर एकूण 47 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर 47 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. याशिवाय भारताचा माजी दिग्गज खेळाडू राहुल द्रविडच्या नावावर 48 आंतरराष्ट्रीय शतके आहेत. आता रोहित शर्मानेही 48 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. विशेष म्हणजे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये रोहित शर्माची बॅट नेहमीच यशस्वी ठरली आहे. रोहित शर्माचे आजचे शतक हे WTC चे 9 वे शतक आहे.

 

रोहित शर्माच्या शतकी खेळीमुळे भारतीय संघ भक्कम स्थितीत पोहोचला आहे. येथून भारताला विजयासाठी विशेष अडचणींचा सामना करावा लागणार नाही. धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण इंग्लिश संघ अवघ्या 218 धावांवर गडगडला. इंग्लंडसाठी फक्त जॅक क्रॉलीने अर्धशतकी खेळी खेळली, याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला फलंदाजी करता आली नाही. प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी अप्रतिम सुरुवात केली. आता रोहित शर्मानंतर शुभमन गिलनेही शतक झळकावले आहे.

IND vs ENG live:"शेर आखिर शेर होता है..!" रोहित शर्माने ठोकले शानदार शतक, जो रूट, एबी डिव्हीलीयर्स यांना मागे टाकत नावावर केला हा मोठा विक्रम..

 

IND vs ENG: यशस्वी जैस्वालने अर्धशतकी खेळी खेळली.

रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. यशस्वीने अवघ्या 58 चेंडूत 57 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 3 षटकारही मारले गेले. यशस्वी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलनेही कर्णधाराला खूप साथ दिली. रोहित आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली होती.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 या 5 खेळाडूंना घाईघाई मध्ये बनवले होते संघाचे कर्णधार, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू. 

IPL: हे 4 खेळाडू जे मुंबई इंडियन्स संघातून बाहेर पडून दुसऱ्या संघात जाऊन कर्णधार बनले, एकाने तर चक्क रोहित शर्मा ला खुन्नस दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *