IND vs ENG: ‘नक्की चूक कुठ झाली काही…” हैद्राबाद कसोटी सामन्यातील पराभवावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य..

IND vs ENG: 'नक्की चूक कुठ झाली काही..." हैद्राबाद कसोटी सामन्यातील पराभवावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य..

IND vs ENG:  टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 28 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. दुसऱ्या डावात संघाला विजयासाठी 231 धावांची गरज होती, मात्र कोणताही खेळाडू जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला. त्याच्याशिवाय अन्य कोणताही खेळाडू मोठा आकडा गाठू शकला नाही. या पराभवानंतर भारतीय संघाच्या फलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पराभवानंतर रोहित शर्माने याची कारणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नक्की काय म्हणाला रोहित जाणून घेऊया.

सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,

“आम्ही  कुठे चुकलो हे सांगणे थोडे कठीण आहे. 190 धावांची आघाडी मिळाल्यानंतर फलंदाजीत आपण खूप पुढे आहोत आणि नियंत्रणात आहोत असे वाटत होते, पण इंग्लंडकडून कमालीची फलंदाजी झाली. विशेषतः भारतीय परिस्थितीत ऑली पोपसारख्या परदेशी फलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी दाखवली. मला वाटत होते की, 231 चे लक्ष्य गाठता येईल, पण आम्ही तसे करू शकलो नाही.”

IND vs ENG: आम्ही एक संघ म्हणून अपयशी ठरलो-रोहित शर्मा

यानंतर रोहित पुढे म्हणाला,

एकूणच आम्ही एक संघ म्हणून अपयशी ठरलो. आम्ही चांगली फलंदाजी केली नाही असे म्हणणे योग्य ठरेल. मात्र, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांनीही सामना पाचव्या दिवसापर्यंत न्यावा, अशी माझी इच्छा होती. तरीही खालच्या फळीतील त्यांच्या संघर्षाचे कौतुक करावे लागेल. केले. एकूणच आम्ही  व्यवस्थित नव्हतो. आम्ही कोणतीही जोखीम घेतली नाही. मालिकेतील हा पहिलाच सामना असला तरी त्यामुळे असे होऊ शकते.

IND vs ENG: 'नक्की चूक कुठ झाली काही..." हैद्राबाद कसोटी सामन्यातील पराभवावर कर्णधार रोहित शर्माचे मोठे वक्तव्य..

मात्र, या पराभवानंतर चाहते भारतीय संघावर नाराज आहेत. भारतीय भूमीवरही टीम इंडियाला एवढं लहान लक्ष्य गाठता आलं नसल्यानं चाहत्यांची निराशा झाली आहे. या पराभवानंतर आता सर्व लक्ष विशाखापट्टणम येथे २ फेब्रुवारीपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीवर असेल.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *