IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा बाहेर तर एकही कसोटी सामना न खेळलेला ‘हा’ युवा खेळाडू संघात दाखल; पहा संपूर्ण संघ..

0
1

IND vs ENG: सध्या सुरु असलेला भारत आणि अफगानिस्तान यांच्यातील 3 टी-20 मालिकेचा दौरा संपताच  भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.  या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने काल म्हणजेच शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे या संघात अशा खेळाडूला स्थान मिळाले आहे, ज्याने आजपर्यंत एकही कसोटी सामना खेळलेला नाही. इंग्लंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे ,पाहूया या बातमीच्या मध्यामधून अगदी सविस्तर..

IND vs SA: दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये..! मागच्या 30 वर्षापासून कधीही जिंकली नाही टीम इंडिया..!

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर.

दोन्ही संघातील ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांसाठी ध्रुव जुरेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तो यष्टिरक्षक फलंदाज आहे. अशा परिस्थितीत इशान किशनला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालेले नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत इशानची निवड न झाल्याने इशान इंग्लंडविरुद्ध पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती, मात्र पुन्हा एकदा त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, आवेश खान

IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, पुजारा बाहेर तर एकही कसोटी सामना न खेळलेला 'हा' युवा खेळाडू संघात दाखल; पहा संपूर्ण संघ..

IND vs ENG : भारत- इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक.

इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. याशिवाय तिसरा सामना 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. चौथा सामना 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाईल. याशिवाय मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान खेळवला जाणार आहे.


हेही वाचा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here