IND vs ENG Test Records: हैद्राबादच्या मैदानावर होणार पहिला सामना, पहा या मैदानावर आजपर्यंत दोन्ही संघात झालेले 10 मोठे विक्रम..!

IND vs ENG Test Records: हैद्राबादच्या मैदानावर होणार पहिला सामना, पहा या मैदानावर आजपर्यंत दोन्ही संघात झालेले 10 मोठे विक्रम..!

IND vs ENG Test Records: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 25 जानेवारीपासून सुरू होत आहे. पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. या मैदानार आतापर्यंत टीम इंडियाला एकाही कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला नाही.

या मैदानावर टीम इंडियाचा पहिला सामना नोव्हेंबर 2010 मध्ये झाला होता, तेव्हापासून येथे 5 कसोटी सामने खेळले गेले आहेत. भारताने 4 जिंकले असून एक सामना अनिर्णित राहिला आहे.  याच मैदानावर भारतीय संघाकडून झालेले काही मोठे विक्रम कोणते आहेत त्यावर एक नजर टाकूया..

 R. Ashwin Test Wickets: इंग्लड विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विन करू शकतो महाविक्रम, कसोटीमध्ये केवळ एकाच भारतीयाने केलाय असा विक्रम.

IND vs ENG Test Record: हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर  संघाने केलेत हे 10 विक्रम.

1. सर्वोच्च धावसंख्या: फेब्रुवारी 2017 मध्ये, भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात 6 विकेट गमावून 687 धावांची मोठी धावसंख्या केली.

2. सर्वात कमी धावसंख्या: ऑक्टोबर 2018 मध्ये, वेस्ट इंडिजचा संघ या मैदानावर केवळ 127 धावांवर आटोपला होता.

3. सर्वात मोठा विजय: मार्च 2013 मध्ये, भारतीय संघाने येथे ऑस्ट्रेलियाचा डाव आणि 135 धावांच्या फरकाने पराभव केला.

4. सर्वात लहान विजय: या मैदानावरील सर्वात लहान विजय देखील मोठ्या विजयापेक्षा कमी नाही. फेब्रुवारी 2017 मध्ये भारतीय संघाने येथे बांगलादेश संघाचा 208 धावांनी पराभव केला होता.

5. सर्वोच्च धावा: येथे चेतेश्वर पुजाराने 4 सामन्यांच्या 5 डावात 510 धावा केल्या आहेत.

6. सर्वात मोठी खेळी: न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने या मैदानावर 225 धावांची मोठी खेळी खेळली आहे. नोव्हेंबर 2010 मध्ये झालेल्या भारत-न्यूझीलंड कसोटीत त्याने 308 चेंडूत 225 धावा केल्या होत्या.

 IND vs ENG Test Records: हैद्राबादच्या मैदानावर होणार पहिला सामना, पहा या मैदानावर आजपर्यंत दोन्ही संघात झालेले 10 मोठे विक्रम..!

7. सर्वाधिक शतके: भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी येथे प्रत्येकी दोन शतके झळकावली आहेत.

8. सर्वाधिक विकेट्स: भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने येथे 4 सामन्यांच्या 8 डावात 27 बळी घेतले आहेत.

9. सर्वोत्तम गोलंदाजी: ऑगस्ट 2012 मध्ये खेळल्या गेलेल्या भारत-न्यूझीलंड कसोटीत अश्विनने केवळ 31 धावा देत 6 विकेट घेतल्या.

10. सर्वात मोठी भागीदारी: मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 370 धावांची भागीदारी झाली होती.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा: 

 

 

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दीपक चहरच्या जागी भारतीय संघात खेळणार ‘आकाश दीप’ कोण आहे? वडील आणि भावाचे निधन, आईने मेहनत करून बनवले क्रिकेटर..

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *