IND vs ENG Test Series: उद्यापासून सुरु होणार भारत-इंग्लंड कसोटी मालिका, पहा पहिला सामना कधी, कुठे, किती वाजता होणार सुरु? कुठे पाहू शकता लाईव्ह..

IND vs ENG Test Series: उद्यापासून सुरु होणार भारत-इंग्लंड कसोटी मालिका, पहा पहिला सामना कधी कुटे किती वाजता होणार सुरु? कुठे पाहू शकता लाईव्ह..

IND vs ENG Test Series:   भारत आणि इंग्लंड 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भिडण्यासाठी सज्ज आहेत. पहिला सामना सुरु होण्याआधीच  इंग्लंडचा हॅरी ब्रूक संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे, तर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांचा भाग असणार नाही.या दोन्ही खेळाडूंनी वैयक्तिक कारणांमुळे हा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघ मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळणार आहेत. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड आणि भारत कसोटी सामन्यात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. सामना किती वाजता सुरू होईल आणि हा सामना कुठे विनामूल्य पाहता येईल याबद्दलची सविस्तर माहिती या बातमीद्वारे जाणून घेऊया..

IND vs ENG Test Series वेळापत्रक

 

 • तारीख                                                सामन्याचे ठिकाण

 • 25-29 जानेवारी 2024                       पहिली कसोटी हैदराबाद

 • 2-6 फेब्रुवारी 2024                           दुसरी कसोटी विशाखापट्टणम

 • १५-१९ फेब्रुवारी २०२४                      तिसरी कसोटी राजकोट

 • २३-२७ फेब्रुवारी २०२४                     चौथी कसोटी रांची

 • 7-11 मार्च 2024                              5 वी कसोटी धर्मशाला

 

IND vs ENG:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात आजपर्यंत या 5 गोलंदाजांनी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स, यादीमध्ये सर्वाधिक भारतीय सामील.

IND vs ENG  कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याबद्दलची काही महत्वाची माहिती..

 

 • भारत-इंग्लंड कसोटी मालिका कधी सुरू होणार?

भारत-इंग्लंड कसोटी मालिका 25 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहे.

 

 • भारत-इंग्लंड पहिली कसोटी कुठे होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.

 • भारत-इंग्लंड कसोटी सामना किती वाजता सुरू होईल?

भारत-इंग्लंड कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.

 • भारत-इंग्लंड पहिल्या कसोटीचा नाणेफेक किती वाजता होणार?

भारत-इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याचा नाणेफेक भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता होणार आहे.

 • भारत-इंग्लंड कसोटी मालिका भारतातील कोणते टीव्ही चॅनेल प्रसारित करतील?

स्पोर्ट्स 18 चॅनलवर भारत-इंग्लंड कसोटी सामने भारतात टीव्हीवर थेट प्रक्षेपित केले जातील.

 • तुम्ही भारत-इंग्लंड पहिली कसोटी विनामूल्य कुठे पाहू शकता?

भारत-इंग्लंड कसोटी सामने जिओ सिनेमा अॅप किंवा वेबसाइटवर विनामूल्य पाहता येतील.

IND vs ENG Test Series: उद्यापासून सुरु होणार भारत-इंग्लंड कसोटी मालिका, पहा पहिला सामना कधी कुटे किती वाजता होणार सुरु? कुठे पाहू शकता लाईव्ह..

IND vs ENG  पहिल्या दोन कसोटींसाठी टीम इंडियाचा संघ.

 

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैस्वाल. अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

IND vs ENG  इंग्लंड संघ

बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, डॅन लॉरेन्स, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *