IND vs ENG, Viral Video: चालू सामन्यात रोहित शर्माचा चाहता घुसला मैदानात, थेट पकडले पाय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IND vs ENG, Viral Video: चालू सामन्यात रोहित शर्माचा चाहता घुसला मैदानात, थेट पकडले पाय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांवर सर्वबाद झाला होता. सामन्यादरम्यान पहिल्या डावात भारतीय फलंदाजीची सलामी देण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी जबरदस्त फलंदाजी केली.

IND vs ENG: रोहित फलंदाजीस आला आणि चाहत्याने घेतली मैदानात इंट्री.

'अश्विन अण्णा अंगार है.." हैद्राबाद कसोटीच्या पहिल्याच दिवशी रविचंद्र अश्विनने रचला इतिहास, भारतासाठी अशी कामगिरी करणारा ठरला पहिला गोलंदाज..

भारतीय कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीसाठी क्रिजवर येताच त्याचा एक चाहता मैदानात दाखल झाला. हा चाहता थेट रोहित शर्माच्या क्रिजवर धावत आला आणि त्याच्या पायाला स्पर्श करू लागला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

 

IND vs ENG:इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांवर आटोपला

हैदराबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 246 धावांत गडगडला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 70 धावांची खेळी केली. याशिवाय जॉनी बेअरस्टोने 37 धावांची आणि बेन डकेटने 35 धावांची खेळी खेळली. भारतीय फिरकीपटूंची जादू पहिल्या डावात पाहायला मिळाली. भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या डावात 8 विकेट्स घेतल्या आहेत.

IND vs ENG, Viral Video: चालू सामन्यात रोहित शर्माचा चाहता घुसला मैदानात, थेट पकडले पाय; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

भारताकडून गोलंदाजी करताना आर अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी ३ बळी घेतले. याशिवाय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनी २-२ बळी घेतले. सामन्याच्या पहिल्या सत्रात इंग्लंडच्या सलामीवीरांकडून चांगली फलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली.

यानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीसाठी फिरकी गोलंदाजांचा वापर केल्याने इंग्लंडचा डाव ढासळू लागला. जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी काही काळ डाव सांभाळला असला तरी हे दोन फलंदाजही भारतीय फिरकीपटूंचा फार काळ सामना करू शकले नाहीत.


हेही वाचा:

WTC Point Table: पहिला कसोटी सामना गमावताच टीम इंडियाला मोठा धक्का, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत घसरला थेट पाचव्या स्थानावर..

Dinesh kartik Dipika Love Story: पहिल्या पत्नीने धोका दिल्यामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात होता दिनेश कार्तिक, दीपिकाने आयुष्यात येऊन फुलवली कारकीर्द

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *