IND vs ENG: विराट कोहली पुढील सर्वच कसोटी सामन्यात नाही खेळणार ,’या’ कारणामुळे संपूर्ण मालिकेतून घेतले नाव मागे..

0
6

IND vs ENG 3rd Test ,Virat Kohli Ruled Out : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने भारत आणि इंग्लंड (IND vs ENG )यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. जो भारतीय संघासाठी मोठा धक्का आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांपासून दूर राहण्याची माहिती दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, कोहलीने शुक्रवारी बीसीसीआयला त्याच्या उपलब्धतेची माहिती दिली. ज्या दिवशी निवडकर्त्यांनी राजकोट, रांची आणि धर्मशाला येथे होणाऱ्या कसोटीसाठी संघ ठरवण्यासाठी ऑनलाइन बैठक घेतली.

यशस्वी जयसवालच्या द्विशतकानंतर टीम इंडियाच्या 'या' 3 खेळाडूंची कारकीर्द झाली बरबाद, आता पुन्हा संधी मिळणे झालंय कठीण..

IND vs ENG : सुरुवातीला दोन सामन्यांतून बाहेर होता विराट कोहली.

भारत आणि इंग्लंड (IND vs ENG ) यांच्यातील या कसोटी मालिकेत ५ सामने खेळवले जाणार आहेत. विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांपासून संघाबाहेर राहण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहलीनेही याबाबत बीसीसीआयला माहिती दिली होती. दोन कसोटी सामन्यांतून बाहेर पडल्यानंतर चाहते विराट कोहलीच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत होते. कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहली टीम इंडियात पुनरागमन करेल, अशी आशा सर्व चाहत्यांना वाटत होती. मात्र आता विराट कोहलीनेही तीन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. ज्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

 

विराट कोहली घरच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ असेल. आता टीम इंडियाच्या अडचणी वाढत आहेत. दुसरीकडे श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली असून, त्यानंतर अय्यरही या संपूर्ण मालिकेतून बाहेर होऊ शकतो. याशिवाय केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे देखील दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर आहेत. मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. प्रथम, हैदराबाद कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा 28 धावांनी पराभव केला, त्यानंतर विशाखापट्टणम कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला.

IND vs ENG: विराट कोहली पुढील सर्वच कसोटी सामन्यात नाही खेळणार ,'या' कारणामुळे संपूर्ण मालिकेतून घेतले नाव मागे..

IND vs ENG: प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार .

 

आतापर्यंत बीसीसीआयने मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघ जाहीर केलेला नाही. निवडकर्तेही विराट कोहलीच्या पुनरागमनाची वाट पाहत होते. पण आता बीसीसीआय लवकरच टीम इंडियाची घोषणा करू शकते. तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्येही बदल केला जाऊ शकतो. पहिल्या सामन्यात जखमी झालेले केएल राहुल आणि रवींद्र जडेजा तिसऱ्या कसोटी सामन्यातही पुनरागमन करू शकतात. याशिवाय दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करू शकतो. आता मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीपासून खेळवला जाणार आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here