IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. हैदराबाद कसोटी सामना जिंकून इंग्लंडने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी हा धक्का कमी नव्हता. भारताला सहज जिंकता आलेला सामना इंग्लंडने जिंकला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. टीम इंडिया या सामन्यात पुनरागमन करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल, पण तुम्हाला माहिती आहे ?का या मैदानावर भारताचा रेकॉर्ड काय आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
IND vs ENG:विशाखापट्टणममधील भारताचा कसोटी विक्रम
भारतीय संघाने या मैदानावर आतापर्यंत एकूण 2 कसोटी सामने खेळले आहेत आणि ते दोन्ही भारताने जिंकले आहेत. यावरून येथे भारताच्या विजयाची टक्केवारी 100 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा स्थितीत या मैदानावर भारताला आव्हान देणे इंग्लंडसाठी सोपे काम असणार नाही. भारताने 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. भारताने हा सामना 246 धावांनी जिंकला. याशिवाय भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2019 मध्ये येथे दुसरा कसोटी सामना खेळला, या सामन्यातही भारताने 203 धावांनी विजय मिळवला. भारताने येथे दोन्ही सामने एकतर्फी जिंकले आहेत. अशा स्थितीत भारत दुसरा कसोटी सामना जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीपूर्वी भारताला बसले 2 धक्के.
दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यातून आपले नाव आधीच मागे घेतले होते. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीही जखमी, आता भारताला आणखी 2 मोठे झटके बसले आहेत. यामुळे भारतीय संघाचे कंबरडे मोडले आहे. हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही जखमी झाला. याशिवाय भारताचा स्टार खेळाडू केएल राहुलही दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत भारताला दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करणे शक्य होईल की नाही, हे पाहणे बाकी आहे.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
कारकीर्द कितीही वादाची असली तरीही, ‘सनथ जयसूर्या’ खेळाडू जबराटचं होता