IND vs NED LIVE: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक २०२३ मध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्याप्रमाणे त्याने पुन्हा एकदा नेदरलँडविरुद्ध दमदार सुरुवात केली. या डावात पहिला षटकार मारताच त्याने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. या विश्वचषकात त्याने ख्रिस गेलला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकार मारण्याचा विक्रम केला. आता त्याने षटकारांचा आणखी एक विश्वविक्रम केला आहे.
IND vs NED LIVE: रोहित शर्मा ठरला एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू..
रोहित शर्मा आता एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. गेल्या सामन्यात त्याने ख्रिस गेलला मागे टाकत एबी डिव्हिलियर्सची बरोबरी केली होती. आता या सामन्यात पहिला षटकार मारून तो एबीडीच्या पुढे गेला. रोहितने मिस्टर 360 डिग्रीचा 8 वर्ष जुना विक्रम मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला. याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकही पूर्ण केले.
एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
-
रोहित शर्मा- ६० षटकार (२०२३ आज पर्यंत)
-
एबी डिव्हिलियर्स- 58 षटकार (2015)
-
ख्रिस गेल- 56 षटकार (2019)
-
शाहिद आफ्रिदी- 48 षटकार (2002)
-
मोहम्मद वसीम (UAE)- 47 षटकार (2023)
#INDvsNED
Time to learn selfishness Rohit bhai.💔 pic.twitter.com/QQXwnu1pXq— 🦅Eagle🦅 (@pkcharanfan) November 12, 2023
IND vs NED LIVE: रोहित शर्माने पूर्ण केले अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वे अर्धशतक..
या डावात रोहित शर्माने 44 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने 500 धावा पूर्ण केल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 100 वे अर्धशतक पूर्ण केले. रोहितच्या नावावर कसोटीत 16 अर्धशतके, एकदिवसीय सामन्यात 55 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 29 अर्धशतके आहेत.
तसेच, त्याच्या नावावर एकदिवसीय विश्वचषकातील हा 13वा अर्धशतक प्लस स्कोअर होता. या बाबतीतही त्याने शाकिब अल हसनची बरोबरी केली. तो आता या बाबतीत विराट कोहली (14) आणि सचिन तेंडुलकर (21) यांच्या मागे आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..