IND vs NED: विराट- रोहीत कोहलीने केली गोलंदाजी, तब्बल 13 वर्षानंतर मिळाली विकेट, पहा व्हिडीओ..

0

IND vs NED: विश्व चषक 2023 चा शेवटचा साखळी सामना काल (12/11/2023) रोजी भारत आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. टीम इंडियाने हा सामना 160 धावांनी जिंकत विश्वचषक मधील सर्वच सामने जिंकले..

या सामन्यात मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे टीम इंडियाची गोलंदाजी.. या सामन्यात टीम इंडियाकडून तब्बल 9 खेळाडूंनी गोलंदाजी केली आहे. भारतीय संघाचा कर्णधार आणि अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने ICC विश्वचषक २०२३ च्या शेवटच्या साखळी सामन्यात एक विकेट घेतली. त्याने 39 चेंडूत 6 षटकार आणि 1 चौकारासह 54 धावा करणाऱ्या तेजा निदामनुरूला बाद केले.

IND vs NED: विराट- रोहीत कोहलीने केली गोलंदाजी, तब्बल 13 वर्षानंतर मिळाली विकेट, पहा व्हिडीओ..
Rohit Sharma Bowling stats

IND vs NED: तब्बल 11 वर्षानंतर रोहित शर्माला मिळाली विकेट.

कर्णधार रोहित शर्माला  यापूर्वीची वनडे विकेट २०१२ मध्ये कॉमनवेल्थ बँक मालिकेच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅथ्यू वेडच्या रूपात आली होती. मेलबर्नमध्ये पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात स्टार यष्टीरक्षक फलंदाज ६७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला होता. तेव्हापासून रोहितने कधी गोलंदाजी क्लेई नव्हती.

IND vs NED: विराट कोहलीनेही मिळवली विकेट.

विराट कोहलीनेही गोलंदाजीत एक विकेट घेतली. त्याने डच कर्णधार स्कॉट एडवर्डसला बाद केले. विराटला याआधी 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये ब्रेंडन मॅक्युलमच्या रूपाने शेवटची विकेट मिळाली होती.

उल्लेखनीय आहे की श्रेयस अय्यर (नाबाद 128) आणि केएल राहुल (102) यांनी शतके झळकावून टीम इंडियाच्या विजयात चमकदार भूमिका बजावली.

IND vs NED: विराट- रोहीत कोहलीने केली गोलंदाजी, तब्बल 13 वर्षानंतर मिळाली विकेट, पहा व्हिडीओ..

भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाहुण्या संघाने 411 धावांचा पाठलाग करताना 250 धावा केल्या.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.