शार्दुल ठाकूर की उमराण मलिक?आज रोहित शर्मा कोणाला देणार संधी? न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवशीय सामन्यासाठी असा असू शकतो भारतीय 11 खेळाडूंचा संघ..
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना रायपूर येथे आज खेळवला जाणार आहे. पहिला सामना जिंकून भारत मालिकेत १-० ने पुढे आहे. हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेण्याकडे भारताचे लक्ष असेल. किवी संघाला या सामन्यात पुनरागमन करायला आवडेल. शेवटच्या सामन्यात 350 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अवघ्या 12 धावांनी पराभूत झाला होता.
शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) पहिल्या वनडेत संधी मिळाली होती तर वेगवान गोलंदाज उमराण मलिकला (Umran Malik) बेंचवर बसावे लागले. पण उमरान मलिक ज्या लयीत गोलंदाजी करत आहे त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. रायपूरमध्ये कोणाला संधी द्यायची याचा निर्णय कर्णधार रोहित शर्माला घ्यावा लागणार आहे.
View this post on Instagram
शार्दुल आणि उमराणमध्ये कर्णधार कोणाला देईल संधी?
टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे म्हणाले की, शार्दुलला आम्ही पहिल्या वनडेत संघात ठेवले कारण तो फलंदाजीत सक्षम आहे. आम्हाला फलंदाजीत सखोलता हवी आहे त्यामुळेच आम्ही त्याला संघात स्थान दिले आहे. उमरणची प्रगती ज्या प्रकारे होत आहे ते पाहून आनंद होतो. वेगालाही खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे गोलंदाजी आक्रमणाला एक वेगळा आयाम मिळतो. पारस म्हणतो की, जोपर्यंत वर्ल्ड कपचा संबंध आहे, उमरानचा पूर्णपणे रणनीतीमध्ये सहभाग आहे आणि तो संघासाठी खूप महत्त्वाचा आहे.

असे असू शकतात दोन्ही संघाचे अंतिम 11 खेळाडू : (BOTH TEAM’S PROBABLY PLAYING 11)
भारत : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड: फिन ऍलन, ड्वेन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर, हेन्री शिपले, लोकी फर्ग्युसन, ब्लेअर टेकनर.
हे ही वाचा..
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…