क्रीडा

भारत-न्यूझीलंड पहिला ट्वेंटी पावसामुळे रद्द झाल्यामुळे बीसीसीआयवर भडकले चाहते, जय शहाला केलं जातंय ट्रोल, कारणही तेवढच विशेष..

भारत-न्यूझीलंड पहिला ट्वेंटी पावसामुळे रद्द झाल्यामुळे बीसीसीआयवर भडकले चाहते, जय शहाला केलं जातंय ट्रोल, कारणही तेवढच विशेष..


वर्ल्डकप संपल्यानंतर पहिल्यांदाच टीम इंडिया आज न्युझीलंड येथे सामना खेळणार होती मात्र. न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील पहिला T20 सामना पावसाने रद्द केला आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे, जिथे त्यांना तीन सामन्यांची T20I मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. हा दौरा आजपासून म्हणजेच १८ नोव्हेंबरपासून सुरू होणार होता पण वेलिंग्टनमध्ये मुसळधार पावसामुळे सामना रद्द करावा लागला. त्याचवेळी सामना रद्द झाल्यामुळे भारतीय चाहते संतापले असून बीसीसीआयवर आपला राग काढत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by BLACKCAPS (@blackcapsnz)

भारत विरुद्ध न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी म्हणजेच १८ नोव्हेंबरला पहिला T20 सामना खेळून होणार होती. पण वेलिंग्टनमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे सामना रद्द करावा लागला.  वेलिंग्टनमध्ये काल सायंकाळपासून  मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतर आज पाऊस थांबण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र पाऊस थांबला नाही.

मध्येच काही क्षण पाऊस थांबला असला तरी काही वेळानंतर पाऊस पुन्हा सुरु झाल्याने सामना सुरुच होऊ शकला नाही. आधी सामन्याच्या खेळाला उशीर झाला, मात्र सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे चाहते बीसीसीआयवर चांगलेच नाराज झाले असूनसोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

आजचा सामना हा रद्द झाल्यामुळे आता या दौऱ्यात पुढील दोन सामनेच निर्णायक ठरणार आहेत. शिवाय पुढील दोन दिवसात सुद्धा न्युझीलंडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे पुढील सामने तरी होणार का नाही? याविषयी ही शंका उपस्थित केली जातेय.

बीसीसीआय

मुख्य म्हणजे बीसीसीआयला तिकडचे वातावरण कसे आहे ते आधीच माहिती असूनही दौरा तिकडे आयोजित केल्यामुळे लोक बीसीसीआयवर प्रचंडनाराज झाले आहेत. आणि सोशल मिडीयावर सध्या बीसीसीआय ट्रोल होतेय.

पुढील ट्वेंटी सामना आता २० तारखेला खेळवला जाणार आहे. निदान यादिवशी तरी सामना व्हायला हवा,अशीच अपेक्षा सध्या प्रेक्षक करत आहेत.


हेही वाचा:

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
TEAM INDIA के प्लेअर्स ने खेली होली, बीसीसीआय ने शेअर किये PHOTO IRAL अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या सुंदर अदानी लुटली मेहफिल, पहा PHOTO 3 indian player who cant play against shrilanka in odi series VIRAL PHOTO:अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा रेड ड्रेसमध्ये बोल्ड लुक! महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या ट्रेडीशनल लुकवर चाहते फिदा,