IND vs NZ: प्रत्येक आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड संघ ठरलाय भारतासाठी घातक, आतापर्यंत तबल एवढ्या वेळा पराभव करुन भारताला केलंय स्पर्धेतून बाहेर.

न्यूझीलंड

 

IND vs NZ: भारताने जागतिक क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत. सांघिक कामगिरीच्या जीवावर अनेक बलाढ्य संघाचा पराभव करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. असेल असेल तरी आयसीसीच्या महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने भारताला हरवले आहे. न्यूझीलंडच्या संघ प्रत्येक वेळी भारतावर वरचढ ठरला आहे. भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक 2023 च्या स्पर्धेतील सामने सुरू आहेत. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना न्यूझीलंडशी (IND vs NZ)   रविवारी 22 ऑक्टोंबर रोजी धर्मशाला च्या मैदानावर रंगणार आहे.

IND vs NZ : कोण कोणावर आहे भारी?

न्यूझीलंडचा संघ जबरदस्त फॉर्मत आहे. दोन्ही संघांमध्ये चांगली कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले गेले आहेत. दोन्ही संघ वनडे विश्वचषकात नऊ वेळा एकमेकाविरुद्ध भिडले आहेत. यात केवळ भारताने तीन वेळा बाजी मारली आहे तर न्यूझीलंडने पाच वेळा विजय संपादन केला आहे तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

NZ vs NED: नेदरलँड्सला करावा लागणार न्यूझीलंडच्या तगड्या फलंदाजांचा सामना, आज न्यूझीलंड-नेदरलँड्स आमने सामने, पहा सामन्याची संपूर्ण माहिती..

1987 साली झालेल्या एकाच विश्वचषकात भारताने पहिल्यांदा न्यूझीलंडला दोनदा नमविले होते. त्यानंतर 2003 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्युझीलँड चा पराभव केला होता. दोन्ही संघात आयसीसी T20 विश्वचषकात तीनदा भिडले आहेत. या तिन्ही सामन्यात भारताला पराभवचे तोंड पाहावे लागले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये 2019 साली झालेल्या विश्वचषकात न्युझीलँड ने भारतावर भारतावर विजय मिळवला होता अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात मार्टिन गप्टिलने अचूक थ्रो फेकत महेंद्रसिंग धोनीला धावबाद केले आणि सामना न्यूझीलंडच्या बाजूने झुकवला. या विजयासह न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला, मात्र अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केला.

न्यूझीलंडने विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यात एकतर्फी विजय मिळवला आहे. जागतिक दर्जाचे गोलंदाज, चपळक्षेत्ररक्षक, स्फोटक फलंदाज असलेला हा संघ विरोधी संघाला मान वर काढू देत नाहीत. दोन्ही संघाचा पुढचा सामना धर्मशालाच्या मैदानावर होणार आहे. हे मैदान छोटे असल्याने या मैदानावर धावांचा पाऊस पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

न्यूझीलंड

न्यूझीलंडचा संघ यावर्षी बदलू शकेल इतिहास? आजपर्यंत एकदाही नही जिंकू शकला ट्रॉफी.

भारताने विश्वचषकावर आपले नाव दोनदा सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. पण न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे भारतीय संघ विश्वचषक सध्या मायदेशात खेळतोय. माय देशात खेळताना भारतीय संघ न्यूझीलंडवर नेहमीच वरचढ ठरलेला आहे हे मागील आकडेवारीवरून स्पष्ट होते. मागील आकडेवारी काही ही असली तरी सध्या जो संघ उत्तम कामगिरी करेल तोच जिंकणार आहे. 


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत