विश्वचषक 2023 मधील पहिला सेमीफायनल सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या सामन्यात जबरदस्त फोर्ममध्ये दिसून येत आहे.
भारत्य संघाच्या डावाची सुरवात करण्यासाठी आलेला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या षटकापासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजावर हल्ला करण्यास सुरवात केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी स्वतः खेळ चालवत आहे.
Rohit Sharma overtakes Gayle to become the highest six hitter in World Cup. #INDVSNZ #CWC23 https://t.co/cUyzXE724W pic.twitter.com/zyP8vqlgs5
— Gaurav Gulati (@gulatiLFC) November 15, 2023
रोहितने आपल्या या खेळीमध्ये सुरवातीलाच चौकार आणि षटकारांचा पाउस पाडायला सुरवात केली आहे. रोहितच्या अग्रेसिव्ह फलंदाजीमुळे टीम इंडियाने पहिल्या 5 षटकातच 50 हून अधिक धावा काढल्या..
IND vs NZ live: रोहित शर्मा ने मोडला क्रिस गेलचा विक्रेम, विश्वचषकाच्या इतिहासात ठोकले सर्वाधिक षटकार
कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात 2 षटकार ठोकत वेस्ट इंडीजचा दिग्गज फलंदाज क्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला आहे. आता रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेच्या 27 सामन्यात 50* षटकार ठोकले आहेत. जे कोणत्याही खेळाडूने ठोकलेले सर्वाधिक षटकार आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडीजचा फलंदाज क्रिस गेलच्या नावावर होता.
गेलने विश्वचषकात तब्बल 49 षटकार ठोकले आहेत. यासाठी त्याने 34 सामने खेळले आहेत. रोहितने मात्र केवळ 27 सामने खेळून गेल ला मागे सोडले आहे. गेल नंतर या यादीत GLENN MAXWELL, डिव्हीलियर्स, डेव्हिड वार्नर यांचा नंबर लागतो..
- हेही वाचा:
- ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत.
- .शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..
- टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..