IND vs NZ LIVE: नाणेफेक जिंकून रोहित शर्माने घेतला फलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

 

IND vs NZ: एकदिवसीय विश्वचषक 2023. विश्वचषक 2023 च्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्याची खरी उत्कंठा अर्ध्या तासानंतर म्हणजेच दुपारी २ वाजता सुरू होईल.

IND vs NZ LIVE: नाणेफेक जिंकून रोहित शर्माने घेतला फलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

IND vs NZ LIVE: एकदिवसीय सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हेड टू हेड.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 117 सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाचा वरचष्मा आहे. ब्लू संघाने किवी संघाविरुद्ध 59 सामने जिंकले आहेत. तर किवी संघाला भारतीय संघाविरुद्ध 50 सामन्यांमध्ये यश मिळाले आहे. याशिवाय सात सामने अनिर्णित राहिले, तर एक सामना बरोबरीत राहिला.

उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी दोन्ही संघातील प्लेइंग इलेव्हन:

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड: रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि टिम साउथी.


  • हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *