IND vs NZ: आज निसर्गाच्या कुशीत वसलेल्या धर्मशाळाच्या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सामना रंगणार आहे. जबरदस्त फॉर्मत असलेल्या भारतीय संघाचा विजयी रथ रोखण्यासाठी किवी संघाचे खेळाडू सज्ज झाले आहेत. फलंदाजीस पोषक असलेल्या या खेळपट्टीवर अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे.
IND vs NZ: भारतीय संघ जबरदस्त फोर्ममध्ये..
रोहित शर्माची सेना जबरदस्त फॉर्मत आहे. याच मैदानावर विराटने मागील सामन्यात शतक ठोकले होते. विराटला रोखणे किवी संघा पुढचे सर्वात मोठे आव्हान असेल. कर्णधार रोहित शर्मा तर विक्रमांचे मनोरे रचत आहे. त्याने न्यूझीलंड विरुद्ध खेळताना 27 सामन्यात 889 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. के. एल. राहुल मागील चार सामन्यापासून नाबाद खेळतोय. श्रेयस अय्यरने या स्पर्धेत एकमेव अर्धशतक ठोकले होते.
हवेत गारवा असल्यामुळे फिरकीपटू रवींद्र जडेजाला खेळणे किवी संघाला अवघड जाणार आहे. फलंदाजाची जोडी फोडण्यात माहेर असलेला कुलदीप यादव हा देखील तुफान फार्मात आहे. गेल्या 20 वर्षापासून विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध खेळताना अपराजित राहिलेल्या न्यूझीलंड संघाला यंदा मात्र भारताविरुद्ध यश मिळवणे जड जाणार आहे. कारण बुमराह, सिराज, जडेजा, कुलदीप यादव यांच्या कामगिरीमध्ये सातत्य आढळून येत आहे.
‘Sunday the king plays’ 🔥#ViratKohli🐐 #WorldCup2023 #INDvsNZ pic.twitter.com/7PcvZt91zu
— 𝗶𝘀𝗵𝗶.🏴 (@kohlifangirl178) October 21, 2023
रवींद्र सचिन याने पहिल्या 4 सामन्यात 216 धावा काढल्या आहेत. डेव्हिड कॉन्वे याने चार सामन्यात 256 धावांचे योगदान दिले आहे. मिचेल सेंटनर हा डावखुरा ऑफ फिरकी गोलंदाज भारतीय संघापुढे आव्हान तयार करू शकतो. त्याने या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतले आहेत. 2019 या विश्वचषकात मॅट हेनरीने भारताला खूपच सतावले होते. यंदाच्या वर्षात देखील तो तुफान फार्मात आहे. ट्रेन्ट बोल्ट हा पहिल्या षटकात विकेट घेण्यात माहीर आहे. भारताविरुद्ध त्याची कामगिरी चांगली आहे. एकंदरीत दोन्ही संघाचे बलाबल पाहिले असता बरोबरीत आहे.
2016 मध्ये याच मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची न्यूझीलंडकडे संधी चालून आली आहे. न्यूझीलंडने या स्पर्धेत सलग चार सामने जिंकत गुणतालिकेत टॉप वर पोहोचला आहे. नेट रन रेटच्या आधारावर न्युझीलंड पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन्ही संघांमध्ये आत्तापर्यंत 116 सामने झाले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडने 50 तर भारताने 58 सामन्यात विजय मिळवला आहे, तर सात सामने टाय झाले आहेत. 1975 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आपसात भिडले होते. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ सेमी फायनल मध्ये एकमेकांविरुद्ध खेळले होते. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. त्या पराभवची सल अजून देखील भारतीय संघाला जाणवत आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ आता तयार झाला आहे.
असे असू शकतात दोन्ही संघ (IND vs NZ probable playing 11)
IND vs NZ : Team India Probable playing 11)
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, आर अश्विन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
IND vs NZ : Team NEW ZEALAND Probable playing 11)
न्यूझीलंड – डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (सी) (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर
- .अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
- पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी