IND vs NZ: सेमीफायनलआधी बीसीसीआयवर मोठा आरोप, भारतीय संघाला जिंकवण्यासाठी बदलली वानखेडेची खेळपट्टी?

IND vs NZ:  आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. 2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा बदला घेण्यासाठी भारतीय संघ या शानदार सामन्यात उतरणार आहे. या सामन्यात खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

मात्र, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, सेमीफायनल सामन्यासाठी ज्या खेळपट्टीची निवड करण्यात आली होती. त्याच्या जागी आणखी एक खेळपट्टी वापरली जाणार आहे ज्यामुळे भारतीय फिरकीपटूंना फायदा होईल.

IND vs NZ, Wankhede Stadium Pitch Report: नाणेफेक जिंकनारा संघच ठरलाय विजयी, मागच्या काही सामन्यात फलंदाजानी काढल्यात एवढ्या धावा..

डेली मेलच्या वृत्तानुसार, आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) खेळपट्टी सल्लागार अँडी ऍटकिन्सन यांनी भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी अशी खेळपट्टी निवडली होती जी आतापर्यंत विश्वचषकात वापरली गेली नव्हती. पण आता अशी खेळपट्टी निवडण्यात आली आहे ज्यावर आतापर्यंत दोन विश्वचषक सामने खेळले गेले आहेत.

रिपोर्ट्समध्ये असे करण्यामागचे कारण भारतीय फिरकीपटूंचा अधिक फायदा घेण्याचे सांगितले जात आहे. तसेच, खेळपट्टी बदलण्यासाठी व्हॉट्सअॅप मजकूर भारतीय आणि आयसीसी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. सामन्यात खेळपट्टी क्रमांक 7 ऐवजी 6 क्रमांकाची खेळपट्टी वापरली जाईल, असे संदेशात म्हटले होते. डेली मेलच्या वृत्तात असेही म्हटले आहे की आयसीसीच्या खेळपट्टी सल्लागाराला असेही सांगण्यात आले आहे की, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी प्रत्यक्षात वापरल्या जाणार्‍या खेळपट्टीमध्ये काही समस्या   आहे.

IND vs NZ: सेमीफायनलआधी बीसीसीआयवर मोठा आरोप, भारतीय संघाला जिंकवण्यासाठी बदलली वानखेडेची खेळपट्टी?

IND vs NZ: उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी  संभावित प्लेईंग 11

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड- डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (कर्णधार), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


  • हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *