IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे बिघडणार टीम इंडियाचे संतुलन, न्यूझीलंडविरुद्ध एक नाही तर 3 खेळाडूंची होणार आदलाबदल..

 

IND vs NZ , World Cup 2023: विश्वचषक 2023 (World Cup 2023) चा 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (HPCA) येथे रविवारी (21 oct) खेळवला जाईल. या सामन्यापूर्वी टीम इंडिया  उपकर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात जखमी झाला होता.

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात होणाऱ्या सामन्यात तो संघाचा भाग असणार नाही. अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन काय असू शकते? जाणून घेऊया एक सविस्तर रिपोर्ट..

ODI World Cup 2023 IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या बाहेर जाण्याचे टीम इंडियाचे वाढले टेन्शन, माजी खेळाडूने रोहित शर्माला दिला मोठा सल्ला..

IND vs NZ सामन्यात सूर्यकुमार यादवला मिळू शकते संधी.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात होणाऱ्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्यात आतापर्यंत बेंचवर बसलेले मोहम्मद शमी (Mohmmad Shami) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)हे खेळाडू टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतात. दुसरीकडे, केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट असलेला आर अश्विन न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही भारतीय संघाचा भाग असू शकतो.

वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सामन्यात भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बरेच मोठे बदल होऊ शकतात. या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी आर अश्विनला तर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शार्दुल ठाकूरच्या जागी मोहम्मद शमीला स्थान मिळू शकते.

तर श्रेयसच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी दिली जाऊ शकते. तसं हा फक्त अंदाज आहे अंतिम निर्णय तर व्यवस्थापकच घेतील मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता टीम इंडियामधील दोन तीन खेळाडूंची तरी आदला बदली होणार हे मात्र नक्की..

 

न्यूझीलंडविरुद्ध  असा असू शकतो भारतीय संघ.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात नेहमी प्रमाणेच कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसतील. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर, केएल राहुल चौथ्या क्रमांकावर, रवींद्र जडेजा पाचव्या क्रमांकावर, सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर आणि आर अश्विन सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. त्यानंतर कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज यांचा  संघात समावेश असेल.

 IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीमुळे बिघडणार टीम इंडियाचे संतुलन, न्यूझीलंडविरुद्ध एक नाही तर 3 खेळाडूंची होणार आदलाबदल..

 

IND vs NZ टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन (IND vs NZ Probable playing 11)

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, आर अश्विन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


हेही वाचा: